कल्याणराव काळे राष्ट्रवादीत; भालके गटाला फायदा होणार का?

April 08, 2021 0 Comments

सोलापूर: ऐन पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्या तोंडावर पंढरपूर तालुक्यातील भाजपचे वजनदार नेते यांनी आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळं भाजपला या निवडणुकीत हा एक मोठा धक्का मानला जात आहे. पंढरपूर तालुक्याच्या राजकारणात पक्षाच्या पलीकडे परिचारक, भालके-पाटील आणि काळे असे गट आहेत. हे गट पांडुरंग परिवार, विठ्ठल परिवार असे विभागले आहेत. विठ्ठल परिवारात पुन्हा काळे-पाटील आणि भालके गट आहेत. त्यापैकी दोन गटांत मनोमिलन झालं की आमदारकी पक्की मानली जाते. त्यामुळं काळेंना या पोटनिवडणुकीत महत्व प्राप्त झाले होते. अशा परिस्थितीत कल्याणराव काळे हे पक्षांतर करणार अशा बातम्या गेल्या आठ दिवसांपासून येत होत्या. पण त्या दरम्यान राष्ट्रवादी आणि भाजप अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून काळे यांची मनधरणी केली जात होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष यांच्याशी प्राथमिक बोलणी झाल्यावर काळे यांनी राष्ट्रवादी सोबत जाण्याचा निर्णय घेतला. भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार बाळा भेगडे आणि हर्षवर्धन पाटील यांनी कल्याणरावांना भाजपमध्येच रोखण्याचा प्रयत्न केला.पण शेवटी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काळे यांनी पंढरपुरात भाजपशी फारकत घेत राष्ट्रवादीचं घड्याळ हाती बांधलं आहे. काळे यांच्या या प्रवेशामुळं त्यांच्या राजकीय पक्षांतराचा चौकट पूर्ण झाला आहे. साखर पट्ट्यातील राजकारणात आपले स्थान भक्कम करणारे आणि वेगवेगळ्या निवडणुकांतून आमदारकीसाठी सातत्याने प्रयत्नशील असणारे संतशिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे वडील स्व.वसंतराव काळे यांनी १९९६ साली युतीचे सरकार असताना काँग्रेसमधून शिवसेनेत जाऊन आपल्या चंद्रभागा साखर कारखान्याच्या अडचणी सोडवल्या, त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं अन २००१ साली काळे पुन्हा स्वगृही परतले. पुढे वसंतरावांच्या निधनानंतर कल्याणराव यांनी चंद्रभागा परिवार जोपासला तो आजतागायत. पण २०१४ च्या निवडणूकीतही कल्याणराव यांनी १ एका दिवसासाठी शिवसेनेत प्रवेश केला मात्र तिकीट मिळत नसल्याचे लक्षात येताच ते माघारी फिरले. २०१९ च्या निवडणूकीत त्यांनी कारखान्याच्या अडचणीपोटी भाजपसोबत जाणं पसंत केलं खरं पण ते तिथं फारसे रमले नाहीत. सरते शेवटी आता २०२१ च्या पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूकीच्यानिमित्ताने त्यांनी भाजपला बाय करत राष्ट्रवादीला म्हंटलंय.त्यामुळं यापूर्वी काँग्रेस, शिवसेना, भाजप आणि आता राष्ट्रवादी या राज्यातील चारही प्रमुख पक्षांत भ्रमंती केलेली आहे. त्यामुळं आता तरी काळेचं राजकीय बस्तान बसणार का? याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: