६० हजार रेमडेसिविरची गरज असताना पुरवठा मात्र २६ हजार, केंद्राकडून महाराष्ट्रावर पुन्हा अन्याय
मुंबई । देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडला आहे. असे असताना केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करताना दिसत आहे. केंद्राकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या मदतीत दुजाभाव दाखवला जात असल्याचे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.
आता रेमडेसिविर वाटपातही केंद्राकडून अन्याय करण्यात आल्याचे वाटपाच्या आकडेवारीतून स्पष्ट होत आहे. राज्यातील रुग्ण संख्या लक्षात घेता रोज ६० हजार रेमडेसिविर मिळणे गरजेचे असताना केंद्राने २१ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीसाठी महाराष्ट्राला केवळ २,६९,२०० रेमडेसिविर पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिवसाला केवळ २६ हजार रेमडेसिविर इंजक्शन दिली जाणार आहेत. या वाटपात गुजरातवर मात्र विशेष मेहरबानी दाखविल्याचे दिसून येते. ३० एप्रिलनंतर रेमडेसिवीर पुरवठ्याची परिस्थिती आणखी स्फोटक बनू शकते, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे.
ऑक्सिजन, रेमडेसिविर पुरवठा, लसीकरण यामध्ये प्रत्येकवेळी केंद्राकडून महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. कोरोनाचा आढावा घेण्यासाठी केंद्राकडून वारंवार पथके पाठवायची मात्र कोणतीही ठोस मदत न करता केवळ महाराष्ट्रावर टीका करण्याचे उद्योग होत असल्याचे एका सनदी अधिकाऱ्यांने सांगितले.
गेल्या महिनाभरात केंद्रीय पथके राज्यात किती वेळा आली व त्याचा राज्याला नेमका काय फायदा झाला याचा लेखाजोखा त्यांनीच मांडून दाखवावा, असे राज्याच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे उघडपणे राज्यावर अन्याय केला जात आहे.
अशा परिस्थितीमध्ये राज्याला मदतीची गरज आहे, मात्र असे होत नाही. केंद्र सरकारने लसीकरण देखील करत असताना राज्यावर अन्याय केला जात आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
ताज्या बातम्या
ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाचे सीईओ ढसाढसा रडले
बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
भाजप आमदाराची जीभ घसरली, म्हणाले ‘अदर पुनावाला डाकू, त्यांची कंपनी ताब्यात घ्या’
0 Comments: