ऑक्सिजन खूप कमी आहे, रुग्ण वाचणार नाहीत; रुग्णालयाचे सीईओ ढसाढसा रडले
दिल्ली । देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. अनेकांना बेड, ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्ध होत नसल्याने अनेकांचे जीव जात आहेत. या सर्व बिकट परिस्थितीची माहिती दिल्लीतील शांती रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील सागर यांनी परिस्थितीबाबत माहिती दिली.
परिस्थिती इतकी गंभीर आहे की याविषयी बोलताना त्यांचे अश्रू अनावर झाले. खूप वाईट स्थिती आहे. आमच्याकडे ऑक्सिजनचा खूप कमी साठा शिल्लक आहे. शक्य आहे त्यांना डिस्चार्ज देण्यास आम्ही डॉक्टरांना सांगितले आहे.
आमच्याकडे फक्त २ तासांचाच ऑक्सिजन उरला आहे, असे सागर यांनी सांगितले. यामुळे परिस्थिती किती हाताबाहेर चालली आहे, हे यावरून लक्षात येईल. देशभरात दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे.
सरकारने तातडीने ऑक्सिजनचा पुरवठा करावा, अशी मागणी केली जात आहे. दिल्लीतील शांती मुकुंद हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा आहे. वेळेत ऑक्सिजनचा पुरवठा झाल्यास रुग्णांना डिस्चार्ज देणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले आहे.
दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या उच्चांक गाठत असताना, कोरोना लस, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स यांची मोठ्या प्रमाणावर टंचाई निर्माण झाली आहे. दिल्लीतही परिस्थिती बिकट आहे. यामुळे सुनील सागर यांना ऑक्सिजनच्या तुटवड्याने रडू कोसळले.
ताज्या बातम्या
बॉलीवूडमधील लोकप्रिय नदीम-श्रवण जोडीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे कोरोनामुळे निधन
एकेकाळी फुगे विकायचा MRF कंपनीचा मालक, आज आहे भारतातील सगळ्यात मोठी टायर बनवणारी कंपनी
शेतकऱ्यासाठी मिरची झाली गोड, तीन महिन्यातच शेतकऱ्याने कमावले ७ लाख
0 Comments: