ऑक्सिजन मिळत नाही अशी तक्रार करणाऱ्यांची संपत्ती जप्त करा; योगींचे भयानक आदेश

April 27, 2021 , 0 Comments

गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना रूग्ण झपाट्याने वाढत चालले आहेत. असे असताना उपचारासाठी लागणारे ऑक्सिजन कमी पडू लागले आहे. अनेकांचे ऑक्सिजन अभावी मृत्यू होत आहेत. असे असताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले, देशात ऑक्सिजनची कमतरता असली तरी उत्तर प्रदेशमध्ये ऑक्सिजनची कुठलीही कमतरता नाही, जो कोणी ऑक्सिजन नाही. असे सोशल मीडियावर लिहिलं त्याची कायद्यानुसार संपत्ती जप्त केली जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

ऑक्सिजनची सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये कोणतीही कमतरता नाही. खरी समस्या काळ्याबाजाराची आणि जमाखोरीची आहे. लोक अफवा पसरवत असून खोटा प्रोपोगंडा चालवत आहेत. त्यांच्याविरोधात कडक कारवाई करा, असेही ते म्हणाले.

यामुळे आता चर्चा सुरू झाली आहे. देशात अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी मृत्युमुखी पडत आहेत. रुग्णांना बेड्स उपलब्ध होत नाहीत, आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी आईआईटी कानपुर, आईआईएम लखनऊ आणि आईआईटी बीएचयू यांच्या साहाय्याने सरकार ऑक्सीजनचे ऑडिट करणार असल्याची माहिती दिली. प्रत्येक कोरोना रुग्णाला ऑक्सिजन ची गरज नसते, असेही ते म्हणाले.

याबाबत माध्यमांनी समाजाला माहिती द्यायला हवी. असे मत देखील त्यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशमध्ये देखील कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. देशात देखील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असून लसीचा पुरवठा देखील कमी होत आहे.

ताज्या बातम्या

भारतीय खेळाडूंना नाही पण परदेशी क्रिकेटपटूला दया आली, ऑक्सीजनसाठी दान केले ३७ लाख

या गावात कोरोना रुग्ण शोधूनही सापडणार नाही; गावकऱ्यांकडे आहे भन्नाट औषध

७० हजारांना रेमडेसिवीर विकत मेडीकलवालाच करत होता काळाबाजार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: