काळजी घ्या! लहान मुलांना संसर्गाची बाधा अधिक

April 04, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, करोनाचा संसर्ग मोठ्याप्रमाणेच मुलांमध्येही हळूहळू वाढत चालला आहे. मुंबई पालिकेच्या १ एप्रिलच्या नोंदीनुसार, ० ते ९ वयोगटात आतापर्यंतच्या एकूण करोना रुग्णांची संख्या ६,८९२ अशी नोंदविली गेली आहे. त्यात मुलांमध्ये ५५ आणि मुलींमध्ये ४५ टक्के इतक्या प्रमाणात करोना आढळला आहे. त्याचवेळी, १० ते १९ वयोगटातील एकूण करोना रुग्णबाधितांची संख्या १७,५४९ अशी आहे. त्यात मुलांचे प्रमाण ५५ टक्के आणि मुलींचे प्रमाण ४५ टक्के एवढे आहे. या दोन्ही वयोगटातील एकूण मृत्यूचा आकडा अनुक्रमे १७ आणि ३२ असे आहे. पालिकेने संपूर्ण वर्षभराच्या अनुषंगाने करोनाबाधित रुग्णांची ० ते ९, १० ते १९, २० ते २९, ३० ते ३९, ४० ते ४९, ५० ते ५९, ६० ते ६९, ७० ते ७९, ८० ते ८९ आणि त्यावरील वयोगटाप्रमाणे नोंद केली आहे. त्यापैकी, ५० ते ५९ वर्षे वयोगटात ७८,४७१ एवढे रुग्ण आहेत. त्यापैकी, पुरुषांचे प्रमाण ४३,१०७ असून महिलांचे प्रमाण ३५,३११ एवढे आहे. पालिकेने १ एप्रिलपर्यंत एकूण रुग्णांची संख्या ४,११,४२४ आणि एकूण मृत्यू आकडा ११,७५५ इतक्या नोंदीच्या आधारे पालिकेने वर्गवारी केली आहे. करोनासंदर्भात मुलांमधील संक्रमणाचा विचार करताना ० ते ९ वर्षे वयोगटातील ६,८९२ मुलांचा समावेश आहे. त्यापैकी, मुलांची संख्या ३,७९१ आणि मुलींची संख्या ३,१०१ एवढी आहे. १० ते १९ वर्षे वयोगटातील १७,५४९ रुग्णांमध्ये ९,१४० मुले आणि ७,६९९ मुलींचा समावेश आहे. या दोन्ही वयोगटातील मृत्यू संख्या अनुक्रमे १७ आणि ३२ अशी आहे. ० ते ९ वर्षे वयोगट एकूण संख्या ६,८९२ मुले : ३,७९१ मुली : ३,१०१ १० ते १९ वर्षे वयोगट एकूण संख्या १७,५४९ मुले-९,१४० मुली-७६९९ २० ते २९ वर्षे वयोगट एकूण संख्या ६०,६२७ पुरुष : ३३,४४५ महिला : २७,२८२ ३० ते ३९ वर्षे वयोगट एकूण संख्या ७०,७१२ पुरुष : ४२,६८७ महिला : ३४,९२५ ४० ते ४९ वर्षे वयोगट एकूण संख्या : ७४,६८८ पुरुष : ४१,०५६ महिला : ३३,५९२ ५० ते ५९ वर्षे वयोगट एकूण संख्या : ७८,४७१ पुरुष : ४३,१०७ महिला : ३५,३११ ६० ते ६९ वर्षे वयोगट एकूण संख्या : ५५,५६६ पुरुष : ३०,५६१ महिला : २५,००५. ७० ते ७९ वर्षे वयोगट एकूण संख्या : २९,१६२ पुरुष : १६,०१९ महिला : १३,१२३ ८९ ते ८९ वर्षे वयोगट एकूण संख्या : ९,८२८ पुरुष : ५,४०५ महिला : ४,४२३ ९० आणि त्यावरील वर्षे वयोगट एकूण संख्या : १,३०९ पुरुष : ७२० महिला : ५८९


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: