'ऊसाचे पैसे द्या, नाहीतर करोनाचे रुग्ण कारखान्याच्या चेअरमनच्या घरी नेऊ'

April 21, 2021 0 Comments

प्रवीण सपकाळ । शेतकऱ्यांच्या ऊसाची बिलं त्वरित द्या, नाहीतर पैशांअभावी उपचार न होऊ शकलेले शेतकऱ्यांच्या घरचे करोना रुग्ण थेट साखर कारखानदारांच्या घरी घेऊन जाऊ, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे. ( Warns ) पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुंबई, पुण्यातून प्रचारासाठी आलेल्या नेत्यांनी पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील गावागावांत प्रसाद वाटल्यासारखा करोना वाटला आहे. आज या भागातल्या घराघरात करोनाचा पेशंट आढळत आहे. रुग्णालयात बेड शिल्लक असताना रोख पैसे भरल्याशिवाय या रुग्णांना प्रवेश दिला जात नाही. दुसरीकडे शेतकऱ्यांना अद्याप ऊसाचे पैसे मिळालेले नाहीत. त्यामुळं मरण दारात उभं असताना सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी वर्गाची आर्थिक कोंडी झालीय. शेतकऱ्यांचे पैसे थकवणाऱ्या कारखानदारांनी पोटनिवडणुकीत कोट्यवधी रुपयांची उधळण केली पण शेतकर्‍यांची बिलं, कामगारांना पगार आणि तोडणी वाहतुकीचे पैसे देण्यासाठी या साखरसम्राटांकडे पैसे नाहीत, असं सांगितलं जात आहे. हा बनाव आहे. कष्टाचे पैसे कारखानदार देत नसल्याने घरातील माणसं उपचाराअभावी मरताना बघण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीतील उमेदवार यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. 'ज्या कारखान्यांच्या चेअरमनने पैसे दिले नाहीत, त्यांच्या घरी आता हे शेतकरी करोनाचे रुग्ण घेऊन जातील. एखादा पेशंट दगावला तर मुडदे घेऊन चेअरमनच्या दारात बसतील,' असा इशारा शिंदे-पाटील यांनी दिला आहे. 'निवडणुकीत उधळायला पैसे आहेत मग शेतकऱ्यांची ऊसाची बिलं, कामगारांचे पगार आणि तोडणी वाहतुकीचे पैसे कसे नाहीत, असा सवालही त्यांनी केला आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: