पतीच्या निधनानंतर एकट्या पडल्या आहेत विजेता पंडित; झाली आहे ‘अशी’ अवस्था

April 25, 2021 , 0 Comments

‘लव्ह स्टोरी’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये ओळख बनवणाऱ्या विजेता पंडित आज ५३ वर्षांच्या झाल्या आहेत. विजेताचा जन्म भारतातील प्रसिद्ध घराण्यात झाला होता. त्यांच्या घरातील अनेक सदस्य संगीत क्षेत्रातील मोठे नाव आहेत. त्यासोबतच पंडित कुटुंबातील अनेक सदस्य अभिनयात देखील सक्रिय आहेत.

८० च्या दशकात प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक राजेंद्र कुमार त्यांचा मुलगा गौरव कुमारच्या बॉलीवूड डेब्युची तयारी करत होते. या चित्रपटासाठी त्यांना एका नवीन चेहऱ्याची गरज होती. म्हणून या चित्रपटात त्यांनी विजेता पंडितला कास्ट केले.

१९८१ मध्ये कुमार गौरवसोबत लव्ह स्टोरी चित्रपटातून त्यांनी बॉलीवूडमध्ये डेब्यु केला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. पहिल्या चित्रपटानंतर विजेता स्टार झाल्या होत्या. पण त्या स्टारडमनंतर त्यांना खुप अपयश बघावे लागले.

लव्ह स्टोरी चित्रपटाच्या शुटींग वेळी विजेता आणि कुमार गौरवमध्ये प्रेम फुलू लागले. दोघांना एकमेकांशी लग्न करायचे होते. पण त्यांचे घरचे मात्र या लग्नाच्या विरोधात होतो. घरच्यांना दुखी करून त्यांना लग्न करीचर नव्हते. म्हणून दोघांनी त्यांचे मार्ग वेगळे केले.

१९८४ मध्ये कुमार गौरवने लग्न केले. पण या ब्रेकअमूळे विजेता खुप दुखी होत्या. त्यांनी पहिल्या चित्रपटानंतर चार वर्षे ब्रेक घेतला. १९८५ मध्ये त्यांनी कमबॅक केला. पण त्यांना खास यश मिळाले नाही. त्यांनी २५ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले.

पण त्यांना पहिल्या चित्रपटासारखे यश परत मिळाले नाही. चित्रपटात यश मिळवण्यासाठी त्यांनी बोल्डनेसचा वापर केला. पण त्यांना यश मिळाले नाही. शेवटी त्यांना काहीही केलं तरी अभिनय क्षेत्र रास येत नव्हते.

अभिनयात यश मिळाले नाही म्हणून त्यांनी १९८६ मध्ये दिग्दर्शक समीर मकलांकसोबत लग्न केले. पण हे लग्न जास्त काळ टिकले नाही. दोघे वेगळे झाले. त्यानंतर१९९० मध्ये विजेताने आदेश श्रीवास्तवसोबत लग्न केले. त्यांचे हे लग्न यशस्वी झाले.

या लग्नातून त्यांना दोन मुलं झाले. पण २०१५ मध्ये कॅन्सरमूळे विजेताच्या पतीचे निधन झाले. पतीच्या लग्नानंतर विजेता खुप एकट्या पडल्या. त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पण दोन्ही मुलांची जबाबदारी असल्यामुळे त्यांनी कधी हार मानली नाही.

विजेता सध्या आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. पैशांसाठी त्यांना स्वतःची गाडी विकावी लागली. पण बॉलीवूडमधून कोणताही कलाकार त्यांच्या मदतीला आला नाही. ८० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रीची आज खुप वाईट अवस्था झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

शाहरूख खानला वाटत होते; राम मंदिराची पायाभरणी मुस्लिमांनी, तर मशिदीची हिंदुंनी करावी

गायिका सुनिधी चौहानने आपल्या नवऱ्यासोबत सुरु असलेल्या वादावर सोडले मौन; म्हणाली…

राजकुमारला भेटण्यासाठी भितींवरून उडी मारून त्यांच्या घरात घुसला होता सलमान खान

…म्हणून बायको ऐश्वर्याला ऑनस्क्रीन किस करत नाही अभिषेक बच्चन


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: