महाराष्ट्रासाठी राहूल गांधी मैदानात! वॅक्सीन पुरवठ्यातील भेदभावावरून मोदी सरकाराला सुनावले

April 09, 2021 , 0 Comments

लसीकरणाबाबत अनेक स्तरांवरून केंद्र सरकारवर टीका होत आहे. देशातील विविध पक्षातील नेते सरकारकडे मागण्या नोंदवत आहेत. त्याचप्रमाणे अनेक राज्य सरकारांनी आपआपल्या मागण्या केंद्राकडे ठेवल्या आहेत. महाराष्ट्रानेही अशी मागणी केली आहे की केंद्राने महाराष्ट्राला वाढीव लसींचा पुरवठा करावा.

लस वाटप करताना भेदभाव करू नये. त्यानंतर गुरूवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. आता या वादात राहुल गांधींनीही उडी घेतली आहे. त्यांनी गुरूवारी ट्वीट केले होते की गरज आणि मागण्यांवर वाद घालणे चुकीचे आहे.

देशातील प्रत्येक नागरीकाला सुरक्षित जीवन जगण्याचा अधिकार आहे. त्यांच्या ट्वीटची काल दिवसभर चर्चा सुरू होती. दरम्यान, नरेंद्र मोदींनी काल असे आवाहन केले होते की कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पुढील २ ते ३ दिवस युद्धपातळीवर प्रयत्न करू.

पात्र लाभार्थींचे अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल या कालावधीत लस उत्सव साजरा करू असे आवाहन मोदींनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केले होते. पण राहूल गांधीनी पुन्हा ट्वीट करत मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी कोरोनाच्या लसींच्या कमतरतेवर प्रश्न उपस्थित केला आहे.

राहुल गांधी म्हणाले आहेत की, कोरोनाच्या वाढत्या संकटात वैक्सीनची कमतरता ही एक अतिगंभीर समस्या आहे उत्सव नाही. आपल्या देशवासियांना धोक्यात टाकून वैक्सीन एक्सपोर्ट करणे योग्य आहे का? केंद्र सरकारने सर्व राज्यांना पक्षपात न करता मदत केली पाहिजे. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायला लागेल, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे.

महत्वाच्या बातम्या
राजेश टोपेंनी थेट पुराव्यासह आकडेवारी देऊन जावडेकर व मोदी सरकारची केली पोलखोल
“सचिन वाझे प्रकरणात माझीही चौकशी करा आणि दूध का दूध पानी का पानी होऊन जाऊ द्या”
मधल्याकाळात माझा ट्रॅक चुकला होता, पण आता पुर्ण जिल्हा राष्ट्रवादीमय करणार- कल्याणराव काळे
“महाराष्ट्र पेटला म्हणून टाळ्या वाजवू नका, निवडणूका असलेल्या ५ राज्यातही कोरोना पेटणार आहे”


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: