करोना रुग्णांचे बनावट रिपोर्ट देत होती 'ही' लॅब, प्रशासनाला कळताच...

April 09, 2021 0 Comments

पंढरपूर: बनावट तपासणी अहवाल तयार करणारी वात्सल्य पॅथॉलॉजी लॅबोरेटरीवर कारवाई करत गुरुवारी सील करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. ( Lab Sealed For ) वाचा: कोविड तालुका कृति समिती मार्फत शहरातील अनधिकृत कोविड टेस्टिंग करून बनावट रिपोर्ट देत होती. याची माहिती मिळताच उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले नायब तहसीलदार कोळी, पोलिस उपनिरीक्षक मगदूम यांच्या पथकाने अचानक धाड टाकली. यावेळी वात्सल्य लॅब चालक आदमिले यास अवैध रिपोर्ट तयार करताना आणि रॅपिड अँटिजेन टेस्ट किट सहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याला किट पुरवणारा तसेच बनावट अहवाल तयार करून देणारा उमेश शिंगटे यालाही पकडले आहे. आदमिले व उमेश शिंगटे या दोघांनी हे काम गेल्या २-३ महिन्यांपासून करत असल्याची कबुली दिली. याबाबत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. वाचा: यावरून आपत्ती व्यवस्थापन अधिनियम अंतर्गत पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुह्यात आणखी किती जण आहेत, याची चौकशी चालू आहे. अशा प्रकारची कोणतीही अनधिकृत कोविड टेस्टिंग आपल्या रुग्णालयात अथवा लॅबमध्ये केली जात नाही ना, याची दक्षता पंढरपूर शहर व तालुक्यातील सर्व डॉक्टर्स आणि पॅथॉलॉजी लॅब चालकांनी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिराम यांनी केले आहे. जर असे काही आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: