पुण्यातील नामांकीत हॉस्पीटलची नर्सच करत होती रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पुणे | राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामूळे राज्यात लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. अशातच राज्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार होत असल्याचं समोर येत आहे. पुण्यातील वाकडमधील एका नामांकित हॉस्पीटलच्या नर्सला रेमडेसिव्हीरचा काळाबाजार केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
नीलिमा घोडेकर असं त्या नर्सचं नाव आहे. तिने तिचा मित्र पृथ्वीराज मुळीक याला रेमडेसिव्हीर दिेले होते. मुळीक त्यानंतर रेमडेसिव्हीरची चढ्या दरात विक्री करत होता. पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर सापळा रचून पृथ्वीराज मुळीक याला अटक केली.
पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर त्याने त्याची नर्स मैत्रीण नीलिमा कडून रेमडेसिव्हीर घेतलं असल्याचं सांगितल. त्यानंतर विक्री करत असल्याचं मुळीक याने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी या प्रकरणी नर्स आणि तिच्या मित्रावर गून्हा दाखल केला आहे. त्यांच्या रॅकेटमध्ये आणखी कोण सहभागी आहे का याचा अधिक तपास पुणे पोलिस करत आहेत.
कोरोना रूग्णांना उपचार वेळेवर मिळत नसल्याने रूग्णांचे हाल होत आहेत. तसेच अनेकांना प्राण गमावावे लागत आहे. रेमडेसिव्हीरसाठी रूग्णांचे नातेवाईक नाईलाजास्तव चढ्या दरामध्ये रेमडेसिव्हीरची खरेदी करत आहेत. त्यात पुण्यातील कोरोना रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
दरम्यान राज्यात मेडिकल दुकाने, हॉस्पीटल यांच्याकडून चढ्या दराने इंजेक्शनची विक्री होत असल्याच्या घटना समोर येत आहे. यासाठी प्रशासनाने पावलं उचलली आहेत. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
राज्यात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन होणार, टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती
“सरकारने व्यापाऱ्यांना आर्थिक मदत करावी अन्यथा आम्ही लाॅकडाऊन जुमानणार नाही”
‘कोरोनामुळे दुकान बंद आहे, ५ हजार रूपयात कसे भागवायचे’ म्हणत सलून मालकाची आत्महत्या
‘देशात रेमडेसिवीरचा तुडवडा आणि भाजप कार्यालयात मोफत वाटले जातेय रेमडेसिवीर’
0 Comments: