पोलिस अधिकाऱ्याची जमावाने केली निर्घूण हत्या, मुलाचा मृतदेह पाहून आईने सोडला प्राण

April 12, 2021 , 0 Comments

किशनगंज | बिहारच्या किशनगंज पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी अश्विनी कुमार आपल्या सहकाऱ्यांसह पश्चिम बंगालमध्ये लुटमार प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी गेले होते. तिथे जमावाने केलेल्या बेदम मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.

कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी असलेल्या मुलाची जमावाने निर्घूणपणे ह्त्या केल्याचं समजताच त्यांच्या आईनेही मूलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने प्राण सोडले आहे. घरातील कर्ता मुलाच्या मृत्यूनंतर आईनेही प्राण सोडल्याने अधिकाऱ्याच्या कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे

अश्विनी कुमार हे आपल्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांसह बंगालमध्ये लुटमारीच्या गून्ह्याचा तपास करण्यासाठी गेले होते. यावेळी पहाटेच्या सुमारासा छापेमारी करत असताना पनतापाडा गावातील जमावाने अश्विनी कुमार यांना पकडून ठेवले. कुमार यांना जमावाने घेरल्याचं पाहताचं त्यांच्या बरोबर असलेल्या पथकाने घटनास्थळावरून पळ काढला.

यामध्ये पोलिस अधिकाऱ्याला सोडून पळ काढल्याचा ठपका ठेवत सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर अश्विनी कुमार यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींनी अटक केली आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी कुमार यांच्या नातेवाईकांनी केली आहे.

दरम्यान कर्तव्य बजावत असलेल्या अधिकाऱ्याच्या निर्घूण हत्येनंतर देशभरामधून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या होण्याची ही पहिली घटना नाही. याआधीही तपासासाठी गेलेल्या पोलिसांच्या निर्घूणपणे हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
पुण्यातील नामांकीत हॉस्पीटलची नर्सच करत होती रेमडेसिव्हीरचा काळाबाजार, पोलिसांनी ठोकल्या बेड्या
२४ तासाच्या आत ‘त्या’ जवानाच्या हत्येचा बदला घेतला; लष्करांनी १२ अतिरेक्यांना संपवले
“मुलाची हौस भागवायला मुख्यमंत्र्यांकडे पैसे आहेत, हातावर पोट असलेल्यांना द्यायला नाहीत का”
फक्त लसच नाही, तर ‘या’बाबतीत पण केंद्राने केला दुजाभाव; चव्हाणांनी आकडेवारी दाखवत केली पोलखोल

 

 

 


Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: