धक्कादायक! शिवकुमारच्या जाचामुळेच दीपाली चव्हाण यांचा गर्भपात
जयंत सोनोने । अमरावती मेळघाटातील वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला डीसीएफ याच्या अडचणींत वाढ झाली आहे. दीपाली या गर्भवती आहेत हे माहीत असतानाही शिवकुमारने त्यांना दोन दिवस पायी फिरवले. त्यामुळं त्यांचा गर्भपात झाल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढं आली आहे. वाचा: दीपाली चव्हाण या सेवेत कार्यरत असताना डीसीएफ शिवकुमार यांनी त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला होता. पोलिसांनी तपासादरम्यान दीपाली यांनी केलेल्या औषधोपचाराची कागदपत्रे हाती आली आहेत. तसेच काही साक्षीदारांचे जबाबसुद्धा नोंदवले आहेत. बारकाईने तपास केला असता शिवकुमार यानेच त्रास दिल्यामुळे दीपाली यांचा गर्भपात झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच शिवकुमारने दीपाली यांना अनेकदा शिवीगाळ करून निलंबित करण्याची तसेच गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन अपमानित केल्याचेही तपासात पुढे आले आहे. त्यामुळे धारणी पोलिसांनी विनोद शिवकुमार याच्या विरोधात आणखी गुन्ह्यांची नोंद केली आहे. त्याच्यावर गर्भपातासाठी कारणीभूत ठरणे, धमकी देणे ही कलमेही लावण्यात आली आहेत. वाचा: हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी २५ मार्च २०२१ राेजी दीपाली यांनी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. दीपाली यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये काही गोष्टी नमूद केल्या होत्या. त्या अनुषंगानं पोलीस तपास सुरू असून रोज नवनवी माहिती पुढं येत आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: