जमील शेख हत्या: राज ठाकरेंचा राष्ट्रवादीला खणखणीत इशारा
मुंबई: मनसेचे ठाण्यातील पदाधिकारी जमील शेख यांच्या खून प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. मनसे अध्यक्ष यांनी आज याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला निर्वाणीचा इशारा दिला. ' यांना अशी मंडळी पक्षात सांभाळायची असतील तर इतरांचे हातही बांधलेले नसतात,' असं सूचक वक्तव्य राज यांनी केलं आहे. वाचा: मनसेचे जमील शेख यांची काही अज्ञात मारेकऱ्यांनी डोक्यात गोळ्या घालून हत्या केली होती. महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशात जाऊन या हत्येचा छडा लावला आहे. त्यानंतर लखनऊ पोलिसांनी जारी केलेल्या प्रेस नोटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाण्यातील नेते नजीब मुल्ला यांचं नाव आलं आहे. राज ठाकरे यांनी आज ही प्रेस नोटच वाचून दाखवली. नजीब मुल्ला यांच्या सांगण्यावरून सुपारी देऊन जमील शेख यांची हत्या करण्यात आली होती. त्या बदल्यात मारेकऱ्यांना दोन लाख रुपये मिळणार होते, असं पोलिसांच्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे. राज ठाकरे यांनी यावरून तीव्र संताप व्यक्त केला. वाचा: 'सत्ताधाऱ्यांची माणसं दिवसाढवळ्या खून करताहेत. ह्याच मुल्लाचं नाव ठाण्यातील बिल्डर सूरज परमार यांच्या हत्या प्रकरणातही आलं होतं. ते प्रकरण केव्हाच रफादफा करून गेलं आहे. आता पुन्हा त्याचं नाव आलंय. राज्य सरकार या प्रकरणात काय कारवाई करणार याची वाट मी बघतोय. पण मी स्वत: लवकरच शरद पवार साहेबांची भेट घेणार आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. 'पवार साहेबांना अशी मंडळी पक्षात सांभाळयची असतील तर इतरांचे हातही बांधलेले नसतात. खुनाला खुनाने उत्तर हे सुसंस्कृत महाराष्ट्रात सुरू झालं तर ते चित्र चांगलं दिसणार नाही. वेळीच या सगळ्याला आवर घालायला हवा. या माणसाला अटक होणं आणि त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे,' असं राज ठाकरे म्हणाले. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: