'अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे; वाझेंचे सारेच मालक चिंतेत'

March 28, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई ' प्रकरणामुळे राज्याची जेवढी बदनामी झाली, तेवढी कोणत्याही प्रकरणाने झालेली नाही. पोलिस दलातील बदल्या, त्यासाठी पैसे घेणे, हप्तेवसुलीचे टार्गेट देणे यातून एक सिंडिकेटराज वाझेंच्या भरवशावर चालवण्यात आले. त्यामुळेच वाझेंचे सारे मालक सध्या चिंतेत आहेत,' असा दावा माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते यांनी शनिवारी केला. 'एनआयएच्या चौकशीत आता वाझे काय-काय बोलणार, यामुळे त्याचे सारेच मालक अस्वस्थ आहेत. मात्र, काळजी करण्याचे कारण नाही. एनआयएच्या चौकशीत सारेकाही स्पष्ट होणार आहे. पोलिस बदल्यांच्या रॅकेटचा अहवाल केंद्रीय गृहसचिवांकडे गेल्याने सारेच घाबरले आहेत. आपले कोणते बिंग फुटणार, याची त्यांना चिंता लागून आहे. असे असले तरी मी केवळ कव्हरिंग लेटर दिले होते. खरेतर नवाब मलिक यांनीच हा अहवाल फोडला आहे,' असा दावा फडणवीस यांनी केला. आयुक्तालयातील डीव्हीआरबाबत माध्यमांमध्ये येत असलेल्या बातम्यांबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले की, आपल्या सरकारच्या काळात मुंबईत सीसीटीव्ही यंत्रणा लागली आहे. डीव्हीआर कुणीही गायब केला तरी त्याचे संपूर्ण बॅकअप मेन सर्व्हरमध्येसुद्धा जमा होत असते. त्यामुळे तो गायब होऊच शकत नाही. त्याचे मिरर इमेजिंगसुद्धा होते. त्याचे डिजिटल फूटप्रिंट तीन ठिकाणी जमा होते. कोणताही एक माणूस ते नष्ट करू शकत नाही. एनआयएच्या चौकशीत साऱ्या बाबी हळूहळू पुढे येतील. नेमकी हीच भीती महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे आणि त्यामुळे ते अस्वस्थ आहेत. वाझेंचे खरे मालक महाविकास आघाडीतच आहेत. त्यांच्याकडून ज्यांनी कामे करवून घेतली, ती आता बाहेर येतील का, हीच चिंता त्यांना सतावत आहे. 'करोनाच्या स्थितीचा विचार करा' 'देशातील आणि राज्यातील करोना स्थिती यातील अंतर इतके का आहे, याचा विचार महाराष्ट्र सरकारला करावा लागेल. जितक्या लस केंद्राने दिल्या, त्या अजूनही वापरलेल्या नाहीत. त्यामुळे उगाच केंद्रावर टीका करण्याऐवजी प्रत्यक्ष करोना नियंत्रणाचे उपाय राबवले पाहिजेच. करोना चाचण्या वाढवण्याचा निर्णय योग्य आहे,' असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: