पुणेकरांनो, जरा सावधच राहा! दररोज होतेय चार वाहनांची चोरी

March 31, 2021 0 Comments

Shrikrishna.Kolhe@timesgroup.com Tweet : @ShrikrishnaKMT : पुण्यात वाहनचोरीचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. गेल्या तीन महिन्यांत ३५०पेक्षा अधिक वाहने चोरीला गेली आहेत. याचाच अर्थ दररोज किमान चार वाहने चोरीला जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे नव्याने स्थापन केलेल्या वाहनचोरी विरोधी पथकाच्या कामावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुणे शहरात वाहनांची, विशेषत: दुचाकींची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यात वाहनचोरीत दुचाकीचोरीचे प्रमाण सर्वाधिक आहे. तीन वर्षांपूर्वी वाहनचोरीचा आकडा तीन हजारांपुढे गेला होता. चोरी रोखण्यासाठी पुणे पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र वाहनचोरी विरोधी पथक आहे; पण वाहनांची चोरी रोखण्यात हे पथक पूर्ण अपयशी ठरले आहे. त्यामुळे दोन वेळा हे पथक बंद करून पुन्हा सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यांत पुण्यात ३६५ वाहने चोरीला गेली आहेत. गेल्या वर्षी पहिल्या तीन महिन्यांत २५५ वाहने चोरीला गेली होती. २०२०मध्ये लॉकडाउन असतानाही ९७५ वाहने चोरीला गेली होती. त्यापैकी फक्त ३३० वाहने जप्त करण्यात पोलिसांना यश आले. त्यात ८७० दुचाकी, ७७ चारचाकी आणि २८ तीनचाकी वाहनांचा समावेश आहे. यंदा मात्र, पहिल्या तीन महिन्यांत वाहनचोरांनी धडाकाच लावल्याचे दिसून आले आहे. दिवसाला सरासरी सहा ते सात वाहने चोरीला जाऊ लागली आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाहनचोरीविरोधी पथके नावालाच पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी वाहनचोरांचा बंदोबस्त करण्यासाठी वाहनचोरी विरोधी दोन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. त्यांची उत्तर आणि दक्षिण अशी विभागणी करून कामाचे वाटपही करण्यात आले. या पथकांना गेल्या चार महिन्यांत म्हणावी अशी कामगिरी करता आलेली नाही. वाहनचोरीविरोधी पथके नावालाच स्थापन करण्यात आल्याचे चित्र आहे. दररोज चार वाहने चोरीला जात असताना ही पथके नेमके करतात काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वाहनचोरीची माहिती वर्ष चोरी उघड २०१९ १,६७६ ६३३ २०२० ९७५ ३३०


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: