आगीत गहू व संत्रा जळून खाक; शेतकऱ्याचा वीज वितरण कंपनीवर आरोप

March 31, 2021 0 Comments

अमरावती / वरुड: तालुक्यातंर्गत येत असलेल्या मांगोना शेतशिवारातील भुपेश शर्मा रा. बेनोडा शहीद यांच्या शेतातील गहु व संत्रा झाडे शॉट सक्रिटमुळे जळून खाक झाल्याची घटना सोमवार दि. २९ ला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे अख्खे शर्मा कुटुंब हवालदिल झाले असून त्यात त्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. शर्मा यांना विज वितरण कंपनीकडून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार किशारे गावंडे, ठाणेदार मिलिंद सरकटे व बेनोडा शहीद येथील विज वितरण कंपनीकडे केली असल्याची माहीती नुकसानग्रस्त भुपेश शर्मा यांनी दिली आहे. काही महीन्यांपासून शेतकरी भुपेश शर्मा यांच्या शेतातील लोंबकळत असलेल्या विद्युत तारा दुरूस्त करण्याची मागणी बेनोडा शहीद येथील विज वितरण कंपनीला लेखी व तोंडी तक्रारी केल्या असून विज वितरण कंपनीने हेतुपुरस्पर दुर्लक्ष करून त्या निवेदनावर कसल्याही प्रकारची कारवाई केली नाही आणि म्हणूच ही घटना घडली असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. जर वीज वितरण कंपनीने या निवेदनाची गंभीर दखल घेतली असती तर आज साडे चार एकरातील गहु व जवळपास १६० संत्रा झाडे जळली नसती असेही त्यांचे म्हणणे आहे. या नुकसानीस विज वितरण कंपनीच जबाबदार असल्याचेही शर्मा यांचे म्हणणे आहे. सुदैवाने कसल्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही हे विशेष. एकीकडे करोनाच्या या महामारीमुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. गहु आणी संत्रा यामधून दोन पैशाचे उत्पन्न घेवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न हे शेतकरी करीत आहे. परंतु शासनाचे कर्मचारी मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नसल्याचं चित्र आहे. केवळ मार्च महीन्याच्या वसुलीकडेच या अधिकाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये सर्वसाधारण शेतकऱ्यांचा बळी या ना त्या कारणाने हे अधिकारी घेत असल्याची चर्चा सुध्दा या निमीत्तानं परिसरात होत आहे. आतातरी सबंधित अधिकाऱ्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्यात यावा अशी मागणी शेतकरी भुपेश शर्मा यांनी केली आहे. घटनास्थळांचा पंचनामा करून मदतीसाठी प्रयत्न करणार मी बेनोडा सबस्टेशनला आता नव्यानेच आलो आहे. माझ्या कारकीर्दीत शेतकरी भुपेश शर्मा यांनी कसल्याही प्रकारचे लेखी वा तोंडी निवेदन दिले नाही. कदाचित अगोदर दिले असेल तर मला माहीती नाही. या प्रकरणाच्या माध्यमातून त्यांचा प्रश्न निकाली काढण्याचा प्रयत्न करणार तर आहोतच, मात्र घटनास्थळाचा पंचनामा करून शासनाकडून काही मदत करता यईल का यासाठी प्रयत्न करणार असल्याचे बेनोडा शहीद विज वितरण कंपनीचे अधिकारी प्रदिप हिवे यांनी सांगीतले.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: