महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? शिवसेनेनं केली 'ही' विनंती

March 10, 2021 0 Comments

मुंबईः राज्यात करोनानं पुन्हा डोकं वर काढलं आहे. काही जिल्ह्यांत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रमांवर मर्यादा आणल्या आहेत. तर, राज्यात पुन्हा लॉकडाऊन लावण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या सर्व परिस्थितीवर शिवसेनेनं भाष्य केलं आहे. तसंच, लॉकडाऊन टाळता आलं तर बघा, अशी विनंतीच सर्वसामान्य जनतेला केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं पाच राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांवरुन जोरदार निशाणा साधला आहे तसंच, महाराष्ट्रातील वाढत्या करोना आकडेवरुनही शिवसेनेनं जनतेला आवाहन केलं आहे. मुंबईत कोरोना वाढला त्याचे खापर 'लोकल ट्रेन्स'वर फोडले जात आहे. तसे असेल तर दिल्लीतही 'मेट्रो' सुरू आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. स्वतःवरच काही निर्बंध घालून जगायला हवे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. 'पंतप्रधान हजारोंच्या सभा घेतात, गृहमंत्री शहा ‘रोड शो’ करतात म्हणून ते स्वातंत्र्य सामान्य नागरिकांना नाही. लोकांनी स्वतःबरोबर आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी. दिल्लीश्वरांना कदाचित दैवी शक्ती प्राप्त झाल्यामुळे 'करोना' त्यांना स्पर्श करीत नसेल, पण सामान्य जनांचे तसे नाही. काळजी घ्या नाहीतर लॉक डाऊन व कडक निर्बंध अटळ आहेत असे वातावरण तयार झाले,' असा सूचक इशारा शिवसेनेनं दिला आहे. महाराष्ट्र पुन्हा लॉकडाऊनच्या दिशेनं? महाराष्ट्र पुन्हा लॉक डाऊनच्या दिशेने जात आहे काय? असे वातावरण निर्माण झाले आहे. करोनावर लस आली आहे. लोक रांगा लावून लस घेत आहेत. लस आल्यामुळे लोकांनी सुटकेचा निःश्वास टाकला असतानाच महाराष्ट्रासह देशभरात करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत, त्यात महाराष्ट्राचा आकडा जास्त आहे ही बाब चिंता करण्यासारखीच आहे. महाराष्ट्रात रोज सरासरी १० हजार नवे रुग्ण करोनाच्या विळख्यात येत आहेत व ७०-७५ जणांचे बळी जात आहेत. प्रशासनाने अनेक भागांत अंशतः लॉक डाऊन सुरू केले. ठाणे, नाशिकसारख्या शहरी भागांत करोनाचे 'हॉट स्पॉट' निर्माण झाले, असंही सामनामध्ये म्हटलं आहे. विदर्भ-मराठवाडय़ातील अनेक भागांत चिंता वाटावी अशा पद्धतीने कोरोना उसळत आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूरसारख्या शहरांत लोकांनी गर्दी केली. बाजार, मॉल्स, लग्न समारंभात निर्बंध पाळले नाहीत. मंदिरे उघडायला लावली. लोकल ट्रेन्स सुरू करण्याचा आग्रह धरल्यामुळे करोना वाढला, असे जे बोलले जात आहे ते खरे मानले तर प. बंगालातील विधानसभा निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत करोना चिरडून मेला काय?, असा सवालही उपस्थित केला आहे. अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे ८४ वर्षांचे ‘मेट्रो मॅन’ ई श्रीधरन यांना भाजपने केरळातील मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर करून करोनाची ऐशी की तैशीच करून टाकली. ज्येष्ठ नागरिकांना करोनाचे सगळय़ात जास्त भय आहे व या काळात साठी पार केलेल्या नागरिकांनी बाहेर पडू नये असे करोनाबाबतचे संकेत आहेत, ते पायदळी तुडवून ८४ वर्षांच्या श्रीधरन यांना भाजपने राजकीय मैदानात उतरवले हे आश्चर्यच आहे. देशातील करोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात ५६ टक्के वाढ एकट्या महाराष्ट्रात आहे असे सांगितले गेले, पण दिल्लीतील करोनाग्रस्तांची संख्या ४२टक्क्यांनी वाढली आहे हेसुद्धा तितकेच खरे. महाराष्ट्रात आकडे लपवले जात नाहीत व इतर राज्यांत अशा आकडे नोंदीची कोणतीच व्यवस्था नाही. प. बंगालात करोनाचा तसा जोर नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगितले जात आहे. बहुधा पंतप्रधानांच्या सभा, भाजप नेत्यांचे भव्य प्रचार दौरे सुरळीत पार पडेपर्यंत करोना प. बंगालमध्ये नाहीच, असे सांगितले जाईल राजकारण हे अशा प्रकारे क्रूर किंवा अमानुष पद्धतीने सुरू आहे. बिहार निवडणुकीतही मोदी-शहा यांनी मोठय़ा सभा घेतल्या. तेथेही करोनासंदर्भातले वैद्यकीय निर्बंध कोणी पाळले नाहीत, पण आता महाराष्ट्राच्या स्थितीबाबत सगळय़ांनाच घोर लागून राहिला आहे


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: