कोपर्डीच्या वेळी रश्मी शुक्ला ठरल्या होत्या संकटमोचक

March 25, 2021 0 Comments

अहमदनगर: फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या वरिष्ठ पोलिस अधिकारी कोपर्डी घटनेच्या वेळी तत्कालीन भाजप-सेना युतीच्या सरकारसाठी संकटमोचक ठरल्या होत्या. तेव्हा पुण्याच्या पोलिस आयुक्त असलेल्या शुक्ला यांना कोपर्डीला पाठविण्यात आले होते. त्यांनीच येथील लोकांची समजूत काढल्याने स्थानिक पातळीवरील आंदोलने थांबली होती. त्यानंतर औरंगाबादमधून मराठा आरक्षणाचा प्रमुख विषय घेऊन आंदोलन सुरू झाले होते. गावातील वातावरण शांत झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री यांचा दौराही सुरळीत झाला होता. जुलै २०१६ मध्ये नगर जिल्ह्यातील कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. त्याला दलित-सवर्ण स्वरूप येऊन प्रकरण राज्यभर गाजले होते. कोपर्डीसह नगर जिल्ह्यात आंदोलने सुरू झाली होती. तेव्हा सत्तेवर असलेल्या भाजप-सेना युतीच्या सरकारविरोधात जनता आणि विरोधकांचा रोष होता. विरोधी नेत्यांनी कर्जतला येऊन आंदोलने केली तसेच विधानसभेतही सरकारला धारेवर धरले. आरोपींच्या अटकेचे सत्र सुरू असतानाही आंदोलनांची धग आणि सरकार विरोधाची धार कायम होती. त्यावेळी शुक्ला पुण्याच्या पोलिस आयुक्त होत्या. तत्कालीन गृहमंत्री तथा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार २० जुलै २०१६ रोजी शुक्ला कोपर्डीला आल्या होत्या. सरकारी दौरा असला तरी साध्या वेषातच त्या गावात आल्या होत्या. येथील गावकरी, महिला, विद्यार्थिनी, कार्यकर्ते यांच्याशी त्यांनी चर्चा केली. विशेषत: विद्यार्थींनीना धीर दिला. त्यामुळे तणाव आणि सरकारविरोधी रोष कमी होऊन गावातील वातावरण निवळण्यास मदत झाली. वाचा: त्यावेळी पत्रकारांशी बोलताना शुक्ला म्हणाल्या होत्या, ‘या प्रकरणाचा तपास माझ्याकडे नाही. पीडित कुटुंब व ग्रामस्थांशी चर्चा करून येथील वातावरण चांगले करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविण्यात आली होती, ती मी पूर्ण केली. तीस दिवसांत आरोपपत्र दाखल करून आरोपींना कडक शिक्षा मिळवून दिली जाईल. या घटनेचा तपास मी करणार नाही. तेथील पोलीस अधीक्षकांकडूनच त्याचा तपास सुरू आहे. गावातील वातावरण चांगले ठेवण्याची जबाबदारी माझ्यावर होती. त्यानुसार मी काम केले. ग्रामस्थांना माझा व तेथील पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाइल क्रमांकही दिले आहेत,’ असे शुक्ला यांनी त्यावेळी सांगितले होते. वाचा: त्यांचा हा दौरा वातावरण निवळणारा ठरला होता. त्यानंतर नेत्यांच्या भेटीगाठी सुरू होत्या. मात्र, नगर जिल्ह्यात सुरू झालेली बंद, रास्तारोको अशी संतप्त आंदोलने थांबली. त्यानंतर फडणवीस यांनीही अचानक कोपर्डीला भेट दिली. त्यांचा हा दौराही सुरळीत झाला होता. पुढे या प्रकरणाने व्यापक स्वरूप घेतले. केवळ कोपर्डी हा मुद्दा न घेता मराठा आरक्षण आणि अन्य मागण्यांना प्राधान्य देत आंदोलने सुरू झाली. औरंगाबादमधून सुरू झालेले हे आंदोलन नंतर राज्यभर पसरत गेले. मात्र, यामध्ये कोणत्याही एका सरकारला दोष न देता, सर्वच सरकार आणि राजकारण्यांना दोष देत शिस्तबद्ध आंदोलने सुरू झाली. कोपर्डी प्रकरणामुळे निर्माण झालेल्या रोषाचे त्यावेळी सरकारला योग्यरित्या व्यवस्थापन करता आल्याचे दिसून आले. सध्या शुक्ला यांचे नाव चर्चेत आल्याने त्यांनी कोपर्डीच्या वेळी पार पाडलेल्या कामगिरीच्या आठवणी ताज्या झाल्या.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: