मोठी बातमी! खाद्यतेल स्वस्त होणार; 'हे' आहे कारण
मुंबई : आयातीचे गणित बिघडल्याने सध्या गगनाला भिडलेले येत्या काळात स्वस्त होण्याची आशा निर्माण झाली आहे. प्रत्येक तेलाच्या शुद्धतेसाठी केली जाणारी 'बेलियर ट्रुबिडिटी टेम्प्रेचर' (बीटीटी) चाचणी ही रद्द करण्यात आली आहे. यामुळे विशेषत: देशांतर्गत तयार होणाऱ्या पारंपरिक खाद्यतेलाचे उत्पादन वाढण्याचा विश्वास तेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मुंबईसह संपूर्ण देशात ६० टक्के पामोलिन तेलाचा वापर केला जातो. सुमारे १० ते १२ टक्के सोयाबीनचा वापर होतो. त्यानंतर उर्वरित खाद्यतेलाचे सेवन होते. यापैकी ६७ टक्के तेल हे आयात केले जाते. देशांतर्गत तयार होणाऱ्या ३३ टक्क्यांमध्ये शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी व कापसाच्या बीपासून तयार होणाऱ्या तेलाचा समावेश आहे. अशा सर्व तेलांना करणे अत्यावश्यक होते. पण देशांतर्गत तयार होणारे शेंगदाणा, तीळ, जवस, मोहरी असे सर्व खाद्यतेल या चाचणीत अयशस्वी होत होते. आता ही चाचणी रद्द केल्याने देशांतर्गत खाद्यतेलांना प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास याविषयी चार वर्षांपासून लढा देणाऱ्या अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या अध्यक्षांनी व्यक्त केला आहे. वाचा: महासंघाचे अध्यक्ष शंकरभाई ठक्कर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स' ला सांगितले की, 'बीटीटी ही चाचणी परदेशी मानकांवर आधारलेली होती. त्यामुळेच परदेशातून आयात होणारे पामोलिन व सोयाबीनसारखे तेल त्यात सहज उत्तीर्ण होत होते. पण देशांतर्गत तेल त्यात अयशस्वी ठरत होते. परिणामी भारतातील खाद्यतेलाचे उत्पादन झपाट्याने कमी होऊ लागले. काही वर्षांपूर्वी आयात होणाऱ्या तेलाची टक्केवारी जेमतेम २२ ते २४ टक्के होती. देशवासियांची तेलाची गरज ही स्वदेशी तेलातूनच पूर्ण व्हायची. पण बीटीटीतील अडथळ्यांमुळे ही टक्केवारी बदलत गेली. आता ६७ टक्के खाद्यतेल आयात करावे लागत आहे. आता हे चित्र पुन्हा बदलेल व त्यातून दर कमी होतील.' आयात घटली करोना संकट व अन्य कारणांमुळे सध्या भारतातील खाद्यतेल आयात ४० टक्के घटली आहे. त्यामुळे तेलाचे दर किमान २५ टक्के वधारले आहेत. भारतीय खाद्यतेल बाजार आयातीवर अवलंबून असल्याने ही स्थिती आहे. त्यामुळेच आता बीटीटी चाचणीचा निकष मागे घेतल्यास देशांतर्गत उत्पादन वाढण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. मुंबईतील प्रमुख खाद्यतेल दर (रुपयांत) प्रकार दर नववर्षातील वाढ पाम ९५-१०० १० ते १२ सोयाबीन ११०-११५ १० राइसब्रान ११०-११४ ८ ते १० सूर्यफुल ११५-१२५ १५ शेंगदाणा १३५-१७५ १५ ते २५ वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: