टाऊनशिप घोटाळा: शिवालिक ग्रुपच्या १२ ठिकाणावंर छापे

March 08, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई सुमारे १४ हजार कोटी रुपयांच्या नोएडा येथील घोटाळ्याचा तपास मुंबईत करण्यात येत आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवालिक समूहाच्या १२ ठिकाणांवर छापे टाकल्याची माहिती आहे. ( raids over a dozen places linked to in Mumbai in ) हा मूळ घोटाळा युनिटेक डेव्हलपर्सचा आहे. युनिटेक डेव्हलपर्सने दहा वर्षे विविध टाऊनशिपच्या नावाखाली २९ हजार ८०० घर खरेदीदारांकडून १४,२७० कोटी रुपये घेतले. या रकमेतून काही फ्लॅटधारकांना घरे देण्यात आली. तर काही टाऊनशिप उभ्याच राहिल्या नाहीत. या १४,२७० कोटी रुपयांपैकी ५,८०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा गैरवापर करण्यात आला व तो पैसा इतरत्र वळविण्यात आला. हा पैसा मुंबईतील शिवालिक समूहाकडे वळवला गेल्याचा ईडीचा संशय आहे. वाचा: युनिटेक डेव्हलपर्सने विविध शहरात टाऊनशिप उभ्या करताना त्या-त्या शहरातील संबंधित एका बांधकाम कंपनीला बरोबर घेतले होते. त्यामध्येच शिवालिक समूहाचा समावेश होता. पण शिवालिक समूहाच्या सहकार्याने मुंबईतील टाऊनशिप व निवासी संकुल उभे राहिलेच नाही. त्या माध्यमातून ५,८०० कोटी रुपयांहून रकमेचा अपहार झाल्याचा ईडीला संशय आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने शिवालिक समूहाची मुंबईतील १२ कार्यालये तसेच अन्य काही ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यांसाठी ईडीचा दिल्लीतील चमू मुंबईत आला होता. छाप्यानंतर महत्त्वाची कागदपत्रे घेऊन चमू दिल्लीला परतला. वाचा: ही कंपनी घोटाळ्यामुळे दिवाळखोरीत निघाली. कंपनीला वाचविण्यासाठी केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालयाने संचालक मंडळ बरखास्त करीत, स्वतंत्र प्रशासकीय मंडळ कंपनीवर बसवले. त्यामध्ये मुंबईतील यांचा समावेश असून तेच आता सरकारने नेमलेल्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: