मुंबईतील भांडुप येथे रुग्णालयाला आग; दोघांचा मृत्यू

March 26, 2021 0 Comments

मुंबई: भांडुप येथील सनराइज रुग्णालयात आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत होरपळून दोघांचा मृत्यू झाला आहे. तर काहीजण जखमी झाले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भांडुप येथील ड्रीम्स मॉलमध्ये हे रुग्णालय आहे. मध्यरात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग भडकली. अचानक घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. आगीची घटना घडली तेव्हा रुग्णालयात ७६ जण उपचार घेत होते. त्यातील ७० रुग्णांना अन्यत्र हलवण्यात आलं आहे. त्यात काही करोना रुग्णांचाही समावेश आहे. लेव्हल ४ ची ही आग असून अग्निशमन दलाचे २३ बंब घटनास्थळी आहेत, अशी माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली. दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर घटनास्थळी पोहोचल्या. तिथं त्यांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून परिस्थितीची माहिती घेतली व आवश्यक त्या सूचना केल्या. 'एखाद्या मॉलमध्ये रुग्णालय असल्याचं मी प्रथमच पाहते आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई केली जाईल,' असं महापौर पेडणेकर यांनी सांगितलं. वाहतूक मार्गात बदल ड्रीम्स मॉलमधील आगीमुळं भांडुप सोनापूर ते गांधी नगर जंक्शन (कंजूरमार्ग) पर्यंत लाल बहाद्दूर शास्त्री मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. सर्व गाड्या पूर्व द्रुतगती मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. आणखी वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: