तीनदा समन्स बजावूनही कंगनाची चौकशीला गैरहजेरी

March 05, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, विशिष्ट समुदायाला लक्ष्य करत जाणीवपूर्वक तेढ निर्माण करणारी व सौहार्दपूर्ण वातावरण बिघडवणारी विधाने सोशल मीडियावर केल्याच्या प्रकरणात चौकशीसाठी अभिनेत्री व तिची बहीण या दोघींना नोव्हेंबर-२०२० ते फेब्रुवारी-२०२१ या कालावधीत तीनदा समन्स पाठवून बोलावण्यात आले. मात्र, त्या एकदाही चौकशीसाठी हजर झाल्या नाहीत, अशी माहिती अंधेरीमधील अंबोली पोलिसांनी गुरुवारी अंधेरी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अहवालाद्वारे दिली. त्यानंतर यासंदर्भात पुढील कायदेशीर कार्यवाही करण्यासाठी न्यायालयाने पुढील सुनावणी ५ एप्रिलला ठेवली. वकील यांनी याप्रकरणी न्यायालयात खासगी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीविषयी सुनावणी घेतल्यानंतर न्यायालयाची त्याची दखल घेतली. तसेच दोन्ही आरोपींविरोधातील पुरावे हे इलेक्ट्रॉनिक स्वरुपातील असल्याने पोलिसांनी चौकशी करून ५ डिसेंबरपर्यंत अहवाल द्यावा, असा अंतरिम आदेश २९ ऑक्टोबर २०२० रोजी दिला. मात्र, तो अहवाल दाखल करण्यासाठी पोलिसांनी आतापर्यंत तीन वेळा एकेक महिन्याची मुदतवाढ घेतली. न्यायालयाने ५ फेब्रुवारीला तिसऱ्यांदा एक महिन्याची मुदतवाढ देतानाच चौकशीचा प्रगती अहवाल देण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार, गुरुवारी अंबोली पोलिसांनी अहवाल सादर केला. पोलिसांनी या प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर राहण्याकरिता कंगना व रंगोलीला १७ नोव्हेंबर २०२०, ८ जानेवारी २०२१ व १६ फेब्रुवारी २०२१ असे तीन वेळा समन्स बजावले. परंतु, त्या हजर झाल्या नाही, असे पोलिसांनी अहवालाद्वारे निदर्शनास आणले. त्यानंतर पुढील कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने पुढील सुनावणी ५ एप्रिलला ठेवली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: