करोनाच्या भीतीमुळे आता वाढला 'हा' त्रास

March 10, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई करोनारुग्णांच्या संख्येत हळूहळू पुन्हा वाढ होत असल्याने पुढे काय होईल या भीतीने निद्रानाशाचा त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे. सततच्या अनिश्चिततेमुळे सर्वसामान्यांचे झोपेचे चक्र बिघडले आहे. या स्थितीला करोनासोम्निया म्हणतात, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पल्मोनोलॉजिस्ट व निद्रा औषध तज्ज्ञ डॉ. अंशु पंजाबी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, गेल्या वर्षी मार्च महिन्यामध्ये ''ने दीडशे लोकांची पाहणी केली. त्या पाहणीमध्ये दीडशेपैकी २५ ते ३० टक्के व्यक्तींना निद्रानाशाचा त्रास होता. तसेच कोविडमुळे निर्माण झालेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या झोपेची गुणवत्ताही बिघडल्याचे दिसून आले. वाचा: सध्याच्या तणावाच्या परिस्थितीमध्ये भावनांचे नियमन करण्याची क्षमताही क्षीण होते. त्यामुळे मनावरचा ताण वाढतो आणि अधिक त्रासदायक परिस्थितीशी सामना करावा लागतो. आर्थिक अस्थैर्य, विषाणूची भीती, काम आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यामध्ये समतोल सांभाळता येत नसल्याच्याही तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण वाढते आहे. ताण हलका करण्यासाठी हे करा काम, जेवणाच्या वेळा, व्यायाम आणि झोप यांचे एक नियमित वेळापत्रक बनवा. घरून काम करत असतानाही कामाला जात असताना जे वेळापत्रक होते ते सुरू ठेवा. या वेळापत्रकाचे पालन केल्यामुळे शरीराची क्रिया व्यवस्थित सुरू राहते. झोपण्यापूर्वी अर्धा ते एक तास मन शांत होण्यास मदत होत असलेले हलके संगीत लावा. मन शांत करणारे संगीत ऐकणे, शब्दकोडी सोडवणे वा एखादे जुने पुस्तक वाचणे, दीर्घ श्वसन यामुळे मनावरील ताण हलका होतो. मोबाइल आणि लॅपटॉपपासून दूर रहा इलेक्ट्रॉनिक उपकरणांतून येणाऱ्या निळ्या प्रकाशामुळे शरीरावर परिणाम होतो. शांत झोपेसाठी मोबाइल फोन आणि लॅपटॉपपासून दूर राहण्यासह झोपण्यापूर्वी नेट सर्फिंग करणे टाळा. चहा आणि कॉफीमधून मिळणारे कॅफेन शरीरात आठ तास राहते. त्यामुळे जेवणाची वेळ आणि झोपेची वेळ यांच्यादरम्यान दीड तासाचे अंतर ठेवा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: