करोना अहवालात फेरफार करून त्यांनी विमानतळ गाठले, पण...

March 10, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोना अहवाल पॉझिटिव्ह असतानादेखील त्यात फेरफार करून विमानाने जयपूरला जाण्याचा तीन रुग्णांचा प्रयत्न निष्फळ ठरला. याप्रकरणी एकाच कुटुंबातील तिन्ही रुग्णांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. ओमप्रकाश जैस्वाल हे महापालिकेसाठी सांताक्रूझ, खार व वांद्रे या परिसरात नागरिकांची करोना तपासणी करणे, अहवाल तपासणे, त्यांचे विलगीकरण करणे आदी कामे करतात. त्यानुसार त्यांनी खार पश्चिमेकडील फेअरमॉन्ट या इमारतीत सहाव्या माळ्यावर राहणाऱ्या थवानी कुटुंबीयांची करोना चाचणी केली होती. वास्तवात ती चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे डॉ. जैस्वाल यांनी त्यांना विलगीकरण करावे लागेल, असे सांगितले. परंतु त्याआधी लखमीचंद थवानी, त्यांच्या पत्नी लीना थवानी व १५ वर्षीय मुलगी दिया थवानी यांनी थायरोकेअर लॅबमध्येदेखील आरटी-पीसीआर चाचणी केली होती. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा दावा थवानी यांनी केला. वाचा: जयपूरला जाणे अत्यावश्यक असल्याने करोना निगेटिव्ह असल्याचे भासवत थवानी कुटुंब खारहून विमानतळाकडे निघाले. विमानतळावर त्यांनी थायरोकेअरचा 'निगेटिव्ह' अहवाल दाखवला. त्याचदरम्यान डॉ. जैस्वाल यांनी थायरोकेअर लॅबशी संपर्क साधला. तेव्हा प्रत्यक्षात थवानी कुटुंबीयांचा अहवाल पॉझिटिव्ह असून त्यांनी अहवालात खाडाखोड व फेरफार करून तो निगेटिव्ह दाखवला असल्याचे स्पष्ट झाले. यामुळेच थवानी हे जेव्हा विमानतळावर पोहोचले तेव्हा आरोग्यसेतू मोबाइल अॅपवर 'लाल' निशाण दिसले. यामुळे त्यांना जयपूरला जाण्यास मज्जाव करण्यात आला. तोवर डॉ. जैस्वाल यांनी महापालिकेच्या सहाय्याने थवानी यांना गाठून तिघांचीही रवानगी विलगीकरण कक्षात केली. यासंबंधी अहवालात फेरफार करण्यासह पॉझिटिव्ह असतानादेखील प्रवास करणे व संसर्ग पसरवण्याच्या आरोपाखाली थवानी कुटुंबीयांविरुद्ध खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: