'या' निवडणुकीच्या निमित्तानं थोरातांना शह देण्याचे विखेंचे प्रयत्न फसले!
अहमदनगर: अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी पारनेरचे राष्ट्रवादीचे उदय शेळके तर उपाध्यक्षपदी संगमनेरचे काँग्रेसचे माधवराव कानवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. महसूल मंत्री यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मदतीने राजकीय खेळ्या करून ही बँक ताब्यात घेण्यात यश मिळविले आहे. यामध्ये भाजपच्या काही संचालकांनीही त्यांना साथ दिली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि यांची यामुळे सहकारात चांगलीच कोंडी झाली आहे. केवळ राजकारण नव्हे तर अनुभवी व्यक्तींना पदे देत बँकेच्या भवितव्याचाही विचार केल्याचे दिसून येते. वाचा: जिल्हा बँकेच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी निवड करण्यात आली. अध्यक्षपदी निवड झालेले शेळके उपमुख्यमंत्री पवार यांचे समर्थक आहेत, तसेच ते थोरात यांचे नातेवाईकही आहेत. जिल्हा बँकेचे संचालक म्हणून त्यांची तिसऱ्यांदा निवड झाली आहे. मुंबईसह राज्यात विस्तार असलेल्या महानगर बँकेचा त्यांना मोठा अनुभव आहे. तर उपाध्यक्ष कानवडे थोरातांचे समर्थक आहेत. त्यांनाही सहकार क्षेत्राचा आणि बँकेचा मोठा अनुभव आहे. पदाधिकाऱ्यांची निवड बनविरोध झाली असली तरी संचालक मंडळाच्या निवडीवेळी मोठे नाट्य पहायला मिळाले. २१ पैकी १७ जागा बिनविरोध झाल्या. तर चार जागांसाठी चुरशीची निवडणूक झाली. अध्यक्षपद मिळालेल्या शेळके यांनाही निवडणुकीला समोरे जावे लागले होते. अध्यक्षपदासाठी अन्य नेत्यांची नावे पुढे आली होती. मात्र, अखेर शेळके यांच्या नावावर एकमत झाले. ज्या पारनेर तालुक्यातील निवड विखेंनी प्रतिष्ठेची केली होती, तेथूनच निवडून आलेल्या शेळके यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. वाचा: विधानसभा निवडणुकीच्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या विखे व पिचड यांना शह देण्यासाठी बँकेच्या निवडणुकीत राजकीय डावपेच खेळण्यात आले. सुरवातील विखे यांनी भाजपच्या नेत्यांच्या मदतीने बँकेत भाजपचा पॅनल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाजपच्याच काही नेत्यांनी तो हाणून पाडला. त्यामुळे पवार आणि थोरात यांनी डावपेच खेळले. बिनविरोध निवड करताना काही भाजपच्या मंडळींचाही मार्ग मोकळा केला, तर काहींना निवडणुकीला सामोरे जाण्याची वेळ आणली. पिचड यांच्या जवळचे मानले जाणारे माजी अध्यक्ष सीताराम गायकर यांनाही फोडून त्यांना बिनविरोध निवडून दिले. भाजपचे संचालक झाले असले तरी त्याच विखेंचे समर्थक मोजकेच आहेत. त्यामुळे बँकेवर काँग्रेस-राष्ट्रवादीसह थोरातांना मानणारे भाजपमधील नेते यांची सत्ता राहणार आहे. यातून विखे आणि पिचड यांच्या सहकारी संस्थांची कोंडी केली जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्थांसाठी कर्जवाटप आणि अन्य कामांसाठी जिल्हा बँक महत्वाची असते. त्यामुळे ती ताब्यात ठेवण्यासाठी सहकार क्षेत्रातील नेत्यांची स्पर्धा असते. वाचा:
from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times
0 Comments: