नगर अर्बन बँक घोटाळा: 'या' अधिकाऱ्याच्या एन्ट्रीमुळे आरोपींचे धाबे दणाणले

March 09, 2021 0 Comments

अहमदनगर: नगर अर्बन बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतील बोगस कर्ज प्रकरणाच्या तपासाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि नगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक यांची एंट्री झाली आहे. नगरला असताना धडाकेबाज कामगिरी करीत त्यांनी कथित गुंड आणि राजकारण्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यामुळे नगर अर्बन बँकेच्या गुन्ह्यातील आरोपी बँकेचे पदाधिकारी आणि संचालकांचे धाबे दणाणले आहेत. () कृष्णप्रकाश यांचा तापास एकाच गुन्ह्यापुरता राहणार की त्यानिमित्ताने बँकेतील गैरप्रकारची नगर पोलिसांकडूनही दुर्लक्षित राहिलेले प्रकरणेही ते बाहेर काढणार, याची चर्चा नगरमध्ये आहे. भाजपचे माजी खासदार दिलीप गांधी यांच्या अध्यक्षपदाच्या काळातील या गुन्ह्याचा तपास सुरू असून त्यांचेही नाव यामध्ये पुढे आल्याने त्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे सांगण्यात येते. काल या गुन्ह्यात आणखी दोघांना अटक झाली असून त्यातील एक जण गांधी यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. वाचा: बँकेच्या पिंपरी-चिंचवड शाखेत प्रत्येकी ११ कोटी रुपयांची दोन बोगस कर्ज प्रकरणे करण्यात आली आल्याचा आरोप आहे. बँकेचे अधिकारी महादेव पंढरीनाथ साळवे (वय रा. नगर) यांनी फिर्याद दिली आहे. मिळकतीचे बनावट मूल्यांकन सादर करून बँकेची फसवणूक करण्यात आली होती. २६ मार्च २०१८ ते २५ जानेवारी २०२१ या काळात हा गुन्हा घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार कर्ज उपसमिती सदस्य, बँकेचे संचालक मंडळ सदस्यांसह आणखी सहा जणांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. कर्ज घेणाऱ्या यज्ञेश बबन चव्हाण (रा. चिंचवड) व तत्कालीन संचालक नवनीत शांतिलाल सुरपुरिया (नगर) यांना पोलिसांनी प्रथम अटक केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अशुतोष लांडगे (नगर) व जयदीप वानखेडे (पुणे) या दोघांना अटक करण्यात आली. यातील एका कर्जप्रकरणातील ११ कोटी रुपये लांडगे याच्या खात्यावर वर्ग झालेले होते. पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. मात्र, ही कर्ज मंजूर करण्यामध्ये सहभाग असलेले बँकेच पदाधिकारी, संचालक, कर्ज उपसमितीचे सदस्य यांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. वाचा: या बँकेतील गैरप्रकरांच्या तक्रारी अनेक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळेच मधल्या काळात संचालक मंडळाची हाकलपट्टी करून बँकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आला. त्यानंतर अशी प्रकरणे उजेडात येऊ लागली आहेत. बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्यासह अन्य माजी पदाधिकारी आणि सभासदांनी यासाठी मोठा पाठपुरावा केला आहे. त्यांनी पाठपुरावा करून ही प्रकरणे पोलिस आणि सरकारच्या संबंधित विभागांपर्यंत नेली. मात्र, ठोस कारवाई झालीच नव्हती. वाचा: आता कृष्णप्रकाश यांच्याकडे एका गुन्ह्याच्या निमित्ताने हे प्रकरण गेल्याने नगरकरांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. कृष्णप्रकाश यांच्या कामाची पद्धत नगरकरांना माहिती असल्याने या गुन्ह्यातही काही बड्या राजकीय पुढाऱ्यांचा संबंध असला तरी कृष्णप्रकाश बधणार नाहीत, अशी पाठपुरावा करणाऱ्यांना अपेक्षा आहे. त्यामुळेच पोलिसांना अधिक माहिती देण्यासाठी तक्रारदार पुढे येत आहेत. या प्रकरणाचा मोठा पाठपुरावा केलेले राजेंद्र गांधी यांनीही कृष्णप्रकाश यांना पत्र लिहून या गुन्ह्याबद्दल आणि बँकेच्या कारभाराबद्दल माहिती कळविली आहे. गांधी यांनी म्हटले आहे की, ‘२०१४ मध्ये या बँकेला मल्टीस्टेट दर्जा मिळवून स्वत:च्या सोयीचे नियम तयार करण्यात आले. तेव्हापासून गैरप्रकारांना वाव मिळू लागला. तत्कालीन पदाधिकाऱ्यांनी बँक खासगी मालमत्ता समजून कारभार केला. नगर अर्बन बँकेला भारतीय संविधानातील व बँकींग रेग्युलेशन अँक्ट मधील कुठलेच कायदे लागू होत नाहीत, आता फक्त आपण बनविलेले कायदेच लागू होतात अशा अविर्भावात मनमनी केली गेली. बँकेच्या शाखांचे नूतनीकरण, जागा खरेदी, नोकरभरती, वाहनखर्च, जाहिरात खर्च, फोटोग्राफीची बिले, सुकामेवाची बिले, सॉफ्टवेअरची बिले, खरेदी प्रक्रिया यापासून थेट वार्षिक सर्वसाधारण सभेचे खाऊचे पुडे वाटपापर्यंत गैरप्रकार आढळून येत असून तशा नोंदी लेखापरिक्षण अहवालात आहेत. त्याच्याही पुढे जाऊन बोगस कर्जप्रकरणे आता उघडकीस येत आहेत. सर्व कायदे, नियम धुडकावून लावत खोटी कागदपत्रे खोटे मूल्यांकन, कर्जदाराची खोटी प्रोजेक्टेड आर्थिक पत्रके तयार परतफेडीचे क्षमतेचे खोटे चित्र रंगवून, प्रसंगी खोटी आयकर रिटर्न्स तयार करून नगर अर्बन बँकेची फसणूक केली आहे. पिंपरी-चिंचवडमधील प्रकारातून हे उघड झालेच आहे. साखळी पद्थतीने हे गैरप्रकार सुरू होते. ते उघडकीस आणणाऱ्यांना दमबाजीही केली जात होती. त्यामुळे आता कृष्णप्रकाश यांनी या सर्व प्रकाराची सखोल चौकशी करावी,’ अशी मागणीही गांधी यांनी केली आहे.


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: