मनीष श्रीवासच्या हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे फेकले मध्य प्रदेशातील घाटात

March 31, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, : कुख्यात हत्याकांडाचा घटनाक्रम जुळविण्यात गुन्हे शाखा पोलिसांना यश आले असून, हत्या केल्यानंतर श्रीवास याच्या मृतदेहाचे तुकडे मारेकऱ्यांनी मध्य प्रदेशातील कुरई घाटात फेकल्याची माहिती समोर आली आहे. खवासा सीमेपासून काही अंतरावर हा घाट आहे. दरम्यान, या हत्याकांडाचा सूत्रधार याच्या चार कार पोलिसांनी जप्त केल्या आहेत. मनीष श्रीवास हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी कुख्यात शरद ऊर्फ कालू नारायण हाटे, त्याचा भाऊ भरत हाटे आणि हेमंत गोरखा या तिघांना अटक केली आहे. हाटे बंधूंना बुधवार, ३१ मार्चपर्यंत तर गोरखा याला ५ एप्रिलपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी सुनावण्यात आली आहे. या हत्याकांडाचा सूत्रधार कुख्यात रणजित सफेलकर हा फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. एकनाथ निमगडे हत्याकांडातही सफेलकर हा पोलिस व सीबीआयला हवा आहे. सफेलकर फरार असल्याने पोलिसांनी त्याची संपत्ती व वाहने जप्त करण्यास सुरूवात केली आहे. श्रीवास याच्या मृतदेहाचे तुकडे कुरई येथे ज्या गाडीतून नेण्यात आलहे होते तिच्यासह सफेलकर याच्या चार कार व मोपेड पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यशिवाय श्रीवास याच्या हत्येसाठी वापरण्यात आलेल्या दोन तलवारीही पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सफेलकर याने ही वाहने एका दलालाला विक्रीसाठी दिली होती. याबाबत कळताच पोलिसांनी दलालालकडून ही वाहने जप्त केली. ४ मार्च २०१२ ला तरुणीचे आमिष दाखवून सफेलकर, हाटे बंधू व त्याच्या साथीदारांनी मनीषचे अपहरण केले होते. जुनी कामठी परिसरातील पावनगाव (धारगाव) येथे मनीषची हत्या केली व नंतर त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुरई घाटात फेकले होते. जुन्या वैमनस्यातून घराला आग नागपूर : जुन्या वैमनस्यातून सहा जणांनी अशोक किसन पाटील (वय ४५) यांच्या घराला आग लावली. ही घटना जरीपटक्यातील गौतमनगर भागात सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने या घटनेत जिवितहानी झाली नाही. पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अभिजित नितीन नितनवरे व त्याच्या पाच साथीदारांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सराफाला गंडा नागपूर : नकली दागिन्यांच्या मोबदल्यात एका महिलेने एक लाख २३ हजार रुपयांचे दागिने खरेदी करून सराफाला गंडा घातला. ही घटना हिंगण्यातील वानाडोंगरीतील बाजार चौकात घडली. हरिभाऊ के. रसाड (वय ५२ रा. झेंडा चौक) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणा पोलिसांनी अज्ञात महिलेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. रसाड यांचे बाजार चौकात रसाड ज्वेलर्स आहे. २५ मार्च रोजी सकाळी एक ४० वर्षीय महिला त्यांच्या दुकानात आली. तिने दुकानातील तरुणीला दागिने दाखवण्यास सांगितले. महिलेने स्वत:कडील दागिने देऊन एक लाख २३ हजार रुपयांचे दागिने खरेदी केली. रसाड यांनी महिलेने दिलेल्या दागिन्यांची तपासणी केली असता ते नकली असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांनी हिंगणा पोलिसांत तक्रार केली.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: