आधी वडील आणि आजोबांचा खून केला, मग तरुणाने...
मुंबई: वडील आणि आजोबांची हत्या करून तरुणानं बिल्डिंगवरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे. मुलुंड पश्चिम येथील वसंत ऑस्कर बिल्डिंगमध्ये ही घटना घडली. सुरेश मांगले (आजोबा), मिलिंद मांगले (वडील) आणि शार्दूल मांगले (मुलगा) अशी मृतांची नावं आहेत. शार्दूलनं हे टोकाचं पाऊल का उचललं, याबद्दल अद्याप काहीही माहिती मिळू शकली नाही. मात्र, या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. सहपोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील स्वत: घटनास्थळी दाखल झाले आहेत. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: