पंढरपूर पोटनिवडणूक: राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना; भाजपचे 'वेट अँड वॉच'

March 25, 2021 0 Comments

पंढरपूर । सुनील दिवाण पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्यासाठी अवघे तीनच दिवस उमेदवारांच्या हातात उरले असताना राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपने अद्यापही आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. () यांच्या निधनामुळं रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी २३ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. महाआघाडीत बंडखोरी केलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना व धनगर समाजाकडून असे दोनच उमेदवारी अर्ज आतापर्यंत दाखल झाले आहेत. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवार असे तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवारांना केवळ आज, उद्या व मंगळवारी असे तीनच दिवस उमेदवारी दाखल करता येणार आहेत. यातच अजून राष्ट्रवादीकडे किंवा यांच्यातील उमेदवारीचा घोळ संपला नसल्याने ही उमेदवारी जाहीर झालेली नाही तर भाजपकडून विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक अथवा गेल्या वेळचे अपक्ष उमेदवार यापैकी कुणाचेही नाव निश्चित झालेले नाही . त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांनी अद्याप आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत. वाचा: यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि धनगर समाजाचे संजय माने यांनी उमेदवारी दाखल करीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली असताना आता शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचा झेंडा फडकावत थेट गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे. गेल्या वेळी त्यांना उमेदवारीचे आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश देण्यात आला होता. मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे . शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य असून महिला वर्गात त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत. शिवसेना उमेदवारी देणार नाही याची जाणीव ठेवूनच त्यांनी अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसापासून गावभेटीचा धडाका लावला आहे. आता लोकशाही आघाडीतील उरलेल्या काँग्रेसनेही पंढरपूर जागेवर आपला दावा केला असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी आम्ही निवडणूक लढविणार असल्याचा दावा केल्याने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला या मित्रपक्षातील बंडखोरांची समजूत काढायचे प्रयत्न करावे लागणार आहेत. वाचा: भाजप व मित्र पक्षाकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून समाधान अवताडे यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी मध्येही भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्या असा आग्रह कार्यकर्त्यातून वाढत चालल्याने पक्षासमोरचा पेच वाढला आहे. खुद्द शरद पवार हे तासगाव पॅटर्न प्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत. मात्र त्यांचा मुलगा भगीरथ याच्यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याने ही उमेदवारी कोणाकडे जाते यावर भाजपचा उमेदवार ठरला जाईल असे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत येत्या दोन दिवसांत उमेदवारी जाहीर न झाल्यास उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ मंगळवारचा एकच दिवस मिळणार आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: