हमीभाव म्हणजे नक्की काय आहे ? तो कसा ठरवतात जाणून घ्या | What is MSP?

February 04, 2021 0 Comments


शेतकरी आंदोलन असो कि केंद्रीय अर्थसंकल्प सध्या हमीभावाच्या मुद्द्याची जोरदार चर्चा सुरु आहे. मात्र अनेकांना याबाबत फारशी माहिती नाही. खास त्या लोकांसाठी हमीभाव म्हणजे काय? तो कोण ठरवतो? तो कसा ठरवतात? याबाबत सविस्तर माहिती...

हमीभाव म्हणजे काय ? 
● MPS म्हणजेच Minimum Support Price यालाच मराठीत किमान आधारभूत किंमत (हमीभाव) असे म्हणतात.
● ही एक प्रणाली असू ज्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल एका ठराविक किमतीत खरेदी करण्याची हमी देत असते.
● याअंतर्गत सध्या २३ शेतमालांची खरेदी सरकार करते. यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, मका, मूग, शेंगदाणा  तीळ आणि कापूस आदींचा  समावेश आहे.

उद्देश काय ?
बाजारात जरी शेतमालाच्या किंमतीत घसरण झाली, तर तेव्हाही केंद्र सरकार ठरवलेल्या हमीभावानेच शेतकऱ्यांकडून शेतमाल खरेदी केला जाईल आणि मग शेतकऱ्यांचे नुकसान टळेल.

हमीभाव कोण ठरवते ? 
● कमिशन फॉर ॲग्रीकल्चर कॉस्ट अँड प्रायझेस (CACP) च्या आकडेवारीवरून भारत सरकारचे कृषी मंत्रालय हमीभाव ठरवते.
● एखाद्या शेतमालाचा संपूर्ण देशातला हमीभाव एकसमान असतो.
● उदा. एक क्विंटल गहू महाराष्ट्रात ज्या दराने सरकार खरेदी करते त्याच दरात तो पंजाबमध्येही खरेदी केला जातो.

हमीभाव कसा ठरवतात ?  उत्पादन खर्च ठरवण्यासाठी केंद्रीय कृषी मूल्य आयोगानं तीन सूत्रं निश्चित केली आहेत.
● ए-2 हे पहिले सूत्र आहे. यानुसार बियाणं, खतं, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन यावरील प्रत्यक्ष खर्च पकडला जातो.
● ए-2+एफ एल हे दुसरे सूत्र आहे. यात शेतकरी आणि त्याच्या घरातील व्यक्तींच्या श्रमाचे मूल्यही मोजले जाते.
● C-2 हे तिसरं सूत्र आहे. यानुसार बियाणे, खते, रासायनिक औषधं, मजूर, सिंचन, इंधन, कुटुंबाचे श्रम यासोबतच गुंतवणुकीवरील व्याज आणि शेत जमिनीचं भाडं निश्चित करून त्याआधारे उत्पादन खर्च ठरवला जातो.

#दीडपट हमीभाव 
मिळणार म्हणजे काय ? 
● शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळणार म्हणजे काय? तर एकंदरीत उत्पादन खर्च अधिक त्या खर्चाच्या पन्नास टक्के नफा, इतका हमीभाव सरकार देणार आहे.
● उदा . १००० हजार रुपये उत्पादन खर्च येणार असेल तर १५०० रुपये हमीभाव सरकार देणार असा याचा अर्थ होतो. 

प्रबोधन युवाशक्ती शिवसेना 2.0 
भारतीय कामगार सेना शिवसेना 

डॉ रघुनाथ कुचिक. 
शिवसेना उपनेता,सरचिटणीस
भारतीय कामगार सेना
अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)
किमान वेतन सल्लागार मंडळ
महाराष्ट्र शासन

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: