'एल्गार परिषदेत शर्जिल उस्मानी चांगलं बोलला, पण...'

February 04, 2021 0 Comments

पुणे: पुण्यातील एल्गार परिषदेत या तरुणानं केलेल्या भाषणावरून महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. शर्जिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताबडतोब अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना तसं पत्रच लिहिलं आहे. हे सगळं सुरू असतानाच एल्गार परिषदेचे आयोजक न्यायमूर्ती (निवृत्त) बी. जी. कोळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ( on 's Speech) वाचा: पुण्यात ३० जानेवारी रोजी झालेल्या एल्गार परिषदेत अलिगड मुस्लिम विद्यापीठातील माजी विद्यार्थी शरजील उस्मानी यानं भाषण केलं होतं. त्यावेळी त्यानं हिंदू समाजाबद्दल अत्यंत आक्षेपार्ह विधानं केली होती. 'आजचा हिंदू समाज पूर्णत: सडलेला आहे, हिंदू समाज हत्या करतो, घरी जाऊन आंघोळ करतो, दुसऱ्या दिवशी पुन्हा हत्या करतो', असं तो म्हणाला होता. त्यावरून प्रचंड गदारोळ उठला आहे. शर्जिलवर ठिकठिकाणी गुन्हे दाखल केले जात आहेत. हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. वाचा: या सगळ्या पार्श्वभूमीवर कोळसे-पाटील यांनी 'एएनआय'कडं प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. 'शर्जिलनं भाषण खूपच चांगलं केलं. मात्र, एक शब्द वापरताना तो चुकला. जातीय मानसिकता दर्शवणाऱ्या 'मनुवादी' किंवा 'ब्राह्मणवादी' या शब्दाऐवजी त्यानं 'हिंदू' हा शब्द वापरला. ती त्याची चूक होती. हे आमच्या लक्षात येताच आम्ही व्यासपीठावरच त्याच्या ते लक्षात आणून दिलं. त्याच्या या वक्तव्यामुळं कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो,' असं कोळसे पाटील म्हणाले. शर्जिलवर कारवाईची मागणी करणाऱ्या भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. 'भाजप कारण नसताना या प्रकरणाचा बाऊ करत आहे. एल्गार परिषदेला बदनाम करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. भाजपनं याआधी देखील हेच केलं आहे. मात्र, यापुढंही होत राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: