Hasan Mushrif: EDच्या चौकशा लावण्यामागे फडणवीस!; ठाकरे सरकारमधील 'हा' मंत्री म्हणाला...

February 16, 2021 0 Comments

नगर: ‘महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात भूमिका असणाऱ्या आणि भाजपला अडचणीच्या ठरू शकणाऱ्यांविरुद्ध ईडीच्या चौकशा लावल्या जात आहेत. हे प्रकार सातत्याने सुरू असून यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसच आहेत,’ असा सनसनाटी आरोप राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नगरचे पालकमंत्री यांनी केला. ‘हे प्रकार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार ‘’ आणि ‘सीबीआय’ संबंधी लवकरच कायदा करणार आहे,’ असेही मुश्रीफ यांनी सांगितले. ( Latest News ) वाचा: हसन मुश्रीफ आज नगर दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ‘प्रत्येक गोष्टीत भाजप अतिशय खालच्या स्तरावरील राजकारण करीत आहेत. देशात सर्वत्र भाजपच्या विरोधातील आवाज दाबून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याच पद्धतीने महाराष्ट्रातही राजकारण खेळले जात आहे. येथेही भाजपच्या विरोधातील लोकांच्यामागे ‘ईडी’ची चौकशी लावली जात आहे. आमची आता खात्री झाली आहे की, हे सर्व फडणवीस हेच करीत आहेत. राज्यात वाढत असलेल्या या प्रकारांकडे राज्य सरकार आता गंभीर्याने पहात असून यासंबंधी लवकरच कायदा केला जाणार आहे. ‘ईडी’ आणि ‘सीबीआय’ या केंद्रीय संस्थांचा राजकीय हेतुने वापर करणाऱ्यास प्रतिबंध करणारा कायदा राज्यात आणणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले. वाचा: पूजा चव्हाण या युवतीच्या मृत्यूप्रकरणी ते म्हणाले, ‘माझ्या माहितीप्रमाणे वनमंत्री यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही. केवळ संशय आणि आरोपावरून कोणाला असे आयुष्यातून उठविले जाऊ नये. पूर्वी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबतीतही असाच प्रकार झाला होता. शेवटी ती तक्रारच मागे घेतली गेली. या प्रकरणातील सत्यही लवकरच बाहेर येईल. मात्र, भाजपच्या मंडळींना महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याची खूपच घाई झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अशा घटनांचे भांडवल करून निराधार आरोप केले जात आहेत'. वाचा: दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला देशप्रेम आणि देशद्रोहाच्या नावाने वेगळे वळण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वातंत्र्य लढ्यात सहभागही नव्हता, त्यांना कुणालाही देशप्रेमी आणि देशद्रोही ठरविण्याचा काय अधिकार आहे?, असा सवाल करताना सलग ७० दिवस शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. त्यात पन्नासहून अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यावर तोडगा काढण्यात केंद्र सरकारला यश आलेले नाही, याकडे मुश्रीफ यांनी लक्ष वेधले. बोठेचा ठाव ठिकाणा मिळाला नगर जिल्ह्यातील रेखा जरे खून प्रकरणासंबंधीच्या प्रश्नाला उत्तर देताना मुश्रीफ म्हणाले की, ‘यातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक न करण्यासंबंधी पोलिसांवर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. त्याचे काही कारणही नाही. उलट ही कारवाई लवकर व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. आजच आपण याचा आढावा घेतला. तेव्हा पोलिसांनी आरोपीचा ठावठिकाणा समजला असल्याचे सांगून लवकरच आरोपीला अटक होणार असल्याचे आपल्याला सांगितले आहे.’ वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: