ठाकरे सरकारमधील 'या' मंत्र्याचं ट्विटर अकाउंट हॅक; प्रोफाइल फोटो बदलला

February 16, 2021 0 Comments

जळगावः शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री यांचे ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पाटील यांनी तक्रार दाखल केली आहे. गुलाबराव पाटील यांच्या ट्विटर अकाउंटवरुन गेले काही तासांपासून संशयास्पद बाब आढळून आली होत्या. त्यानंतर अचानक त्यांच्या अकाउंट प्रोफाइल लॉक करण्यात आली असून प्रोफाइल फोटोही बदलण्यात आला आहे. वाचाः गुलाबराव पाटील यांचं ट्विटरवर @GulabraojiPatil हे अधिकृत ट्विटर अकाउंट असून ते व्हेरिफाईड आहे. याच अकाउंटवरुन ते सातत्याने ट्वीट करत असतात. मात्र, अचानक गुलाबराव पाटील यांची टाइमलाइन लॉक करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं. याआधी त्यांची ट्विटर टाइमलाइन पब्लिक होती म्हणजेच सर्वांसाठी खुली होती. तसंच, प्रोफाइलला गुलाबराव पाटील यांचा असलेला फोटो बदलून एका परदेशी इसमाचा फोटो लावण्यात आला आहे. गुलाबराव पाटील यांचं अकाउंट हॅक झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पाटील यांच्या ट्विटर अकाउंटवरुन अद्याप कोणतेही संश्यास्पद ट्वीट करण्यात आले नाहीये. याबाबत स्वतः गुलाबराव पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून सायबर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: