Coronavirus: लॉकडाऊनची शक्यता असतानाच 'या' जिल्ह्याने घेतला कठोर निर्णय

February 17, 2021 0 Comments

नगर: ‘मराठवाड्याचा शेजारील जिल्हा म्हणून नगर जिल्ह्यात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. अद्याप गेलेला नाही. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरा, अन्यथा पोलीस दंड करणार आहेत. जर नागरिकांनी नियम पाळले नाहीत, तर शिथील करण्यात आलेले नियम कडक करण्यात येतील प्रसंगी लॉकडाऊनसारखा कठोर निर्णयही घ्यावा लागेल,’ असा इशारा जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. ( ) वाचा: मुख्यमंत्री यांच्यासमवेत झालेल्या बैठकीचा संदर्भ देत डॉ. भोसले आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी जिल्ह्यातील नागरिकांना हे आवाहन केले आहे. डॉ. भोसले म्हणाले, 'कमी झालेले करोनाचे प्रमाण पुन्हा वाढू लागले आहे. विदर्भ-मराठवाड्यात आकडे लक्षणीयरित्या वाढले आहेत. त्यामुळे मराठवाड्याचा शेजारील जिल्हा म्हणून आपल्या नगर जिल्ह्याला अधिक काळजी घेण्याची गरज आहे. त्यामुळे आता आपण पुन्हा मास्कची सक्ती करणार आहोत. आम्ही पोलिसांना सूचना दिल्या आहेत की, सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा. यासोबतच चाचण्यांची संख्या वाढविण्यात येत आहेत. सर्व खासगी डॉक्टरांनी पूर्वीप्रमाणेच लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांना चाचणीसाठी पाठवायचे आहे. फेरीवाले, केशकर्तनालय, हॉटेल, भाजी विक्रेते, दुकानदार यांच्या बैठका घेऊन त्यांनाही काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येणार आहे'. वाचा: 'आपल्याकडे लग्नासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. ती टाळली पाहिजे. लग्नासाठी परवानगी घेऊन त्यानुसार केवळ पन्नास जणांनाच निमंत्रित केले पाहिजे. या पेक्षा जास्त गर्दी आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय चालकांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. आर्थिक घडी विस्कटू नये म्हणून आपण मधल्या काळात नियमांमध्ये शिथीलता दिली होती. मात्र, त्याचा उलटा परिणाम होणार असेल तर पुन्हा कठोर कारवाई करावी लागणार आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊनसारख्या उपाययोजना टाळायच्या असतील तर प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. आम्ही आता यंत्रणा पुन्हा सक्रिय केली आहे. पोलीस, महापालिका, आरोग्य विभाग पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले असून त्यांना पूर्वी नेमून दिलेली कामे आणि कडक अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. लक्षणे असणाऱ्या रुग्णांनी तपासणी करून घ्यावी आणि सर्वांनीच नियम पाळावे,’ असे आवाहनही जिल्हाधिकारी भोसले यांनी केले आहे. वाचा:


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: