पुण्यात करोनाचे रुग्ण वाढले; महापौरांनी दिले मोठे संकेत

February 17, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, पुणे: शहरातील करोना रुग्णसंख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मास्क न घालणाऱ्या आणि सुरक्षित वावराच्या नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांवर कारवाईच्या सूचना पोलीस प्रशासनाला देण्यात येणार आहेत, असे महापौर यांनी बुधवारी सांगितले. 'सध्या लॉकडाऊनचा कोणताही विचार नाही, मात्र येत्या काळात रुग्णसंख्या वाढल्यास शहराच्या काही भागात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे (मायक्रो कंटेंमेंट झोन) आणि काही प्रमाणात बंधने आणावी लागतील,' असा इशाराही त्यांनी दिला. करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी महापालिका आयुक्तांसोबत तातडीची बैठक घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. उपमहापौर सरस्वती शेंडगे आणि सभागृह नेते गणेश बिडकर या वेळी उपस्थित होते. वाचाः 'गेल्या आठवड्यात १३०० च्या आसपास असलेली करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या आता १७०० वर पोहोचली आहे. पॉझिटिव्हीटी दरही ४.६ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर गेला आहे. नगर रस्ता, बिबवेवाडी, सिंहगड रस्ता आणि वारजे क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणची चाचणी केंद्रे, चाचण्यांचे प्रमाण आणि केंद्रावरील मनुष्यबळ वाढविण्यात येणार आहे. ससूनसह पालिकेच्या रुग्णालयात ११६३ खाटा उपचारांसाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून, खासगी रुग्णालयांना खाटा उपलब्ध ठेवण्याचे आदेश देण्यात येणार आहेत,' असेही त्यांनी सांगितले. वाचाः वाचाः


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: