पुन्हा लॉकडाऊनची गरज आहे का?; टास्क फोर्समधील तज्ज्ञ म्हणतात...

February 17, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई: करोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असताना सुरक्षित अंतर तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे पुन्हा रुग्णसंख्या वाढताना दिसत आहे. मात्र ती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सक्षम आहे व त्यासाठी लॉकडाउन करण्याची गरज नाही, असा सूर टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या बैठकीमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. (No Need of Another ) वाचा: संसर्गाचे प्रमाण कमी व्हावे यासाठी राज्य सरकारसह पालिका प्रशासनानेही अथक प्रयत्न केले. मुंबईतील संसर्ग नियंत्रणात आणून दररोज नव्याने वाढणारी रुग्णसंख्या अडीचशे ते तीनशेपर्यंत मर्यादित आणली. पण गेल्या काही दिवसांत हीच संख्या पुन्हा वाढून मुंबईत दररोज नवे पाचशे ते साडेपाचशे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लॉकडाउन करून पुन्हा कडक नियम लागू करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. टास्क फोर्समधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या बैठकीमध्येही सोमवारी या मुद्द्यांवर चर्चा झाली. समितीमधील वरिष्ठ वैद्यकीय सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाउन करण्याचे मत कुणीही व्यक्त केले नाही. पालिकेने तपासण्यांची तसेच टेस्टिंग व ट्रेसिंगची प्रक्रिया जलदगतीने सुरू ठेवायला हवी. तसेच लसीकरणाचे ध्येय गाठण्यावर लक्ष केंद्रित करत असताना संसर्गाचे प्रमाण कसे कमी होईल, याकडे सातत्याने लक्ष ठेवायला हवे, असे मत व्यक्त केले. वाचा: मुंबईत अनेक जणांनी मास्कला सोडचिठ्ठी दिली आहे. लसीकरण झाल्यानंतरही मास्क लावण्याची गरज आहे. मात्र अनेक जणांनी संपला या भ्रमात वावरायला सुरवात केली आहे. शहरांप्रमाणे ग्रामीण भागांमध्येही करोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे या ठिकाणी आरोग्यव्यवस्था सक्षम करण्यासह आणीबाणीच्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयसीयूची उपलब्धता वाढवणेही महत्त्वाचे आहे. या मुद्द्यांवर टास्क फोर्समधील सदस्यांचे एकमत झाले. कारवाईचा बडगा हवा ज्या ठिकाणी नियमांचे पालन होत नाही, त्या ठिकाणी कडक कारवाईचा बडगा उचलण्याची गरज आहे. करोना संसर्गाचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर दिलेल्या निर्देशांचे पालन करणे गरजेचे आहे. संसर्ग योग्यप्रकारे नियंत्रणात येईल, यासाठी पुन्हा लॉकडाउन करण्याची गरज नाही, याकडेही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: