'जीव वाचवण्यासाठी शिवसेना आणि पैसे गोळा करायला भाजप'

February 17, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई बाबरी मशिद प्रकरणावेळी सर्वसामान्यांचे प्राण वाचवण्यासाठी शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजपवाले पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री यांनी मंगळवारी भाजपवर टीका केली. स्वातंत्र्य संग्रामात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कुठेही नव्हता, असे सांगत भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्व करेल असेही ते म्हणाले. ( Targets BJP) वाचा: शिवसेनेचे संपर्कप्रमुख, जिल्हाप्रमुख आणि काही आमदारांची बैठक बोलावली 'वर्षा' बंगल्यावर पार पडली. त्यावेळी उद्धव यांनी भाजप तसेच 'आरएसएस'वर निशाणा साधला. राममंदिर बांधण्याबाबत देशभरारतून वर्गणी गोळा केली जात आहे. त्याविषयी बोलताना ते म्हणाले की, रामाच्या नावाने काही लोक घरोघरी पैसे मागण्यासाठी जात आहेत. पण आपल्याला तसे करायचे नाही. बाबरी मशिद प्रकरणात शिवसेना रस्त्यावर उतरली होती. आता भाजप पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. देखो ये काम ना करो, राम का नाम बदनाम ना करो, असे म्हणत उद्धव यांनी भाजपला चांगलेच फैलावर घेतले. वाचा: नेपाळ आणि श्रीलंकेत सत्ता स्थापन करणार असे म्हणतात. हिंमत असेल तर पाकिस्तान, बांगलादेशमध्ये सत्ता स्थापन करून दाखवा. मग आम्ही तुमचे स्वागत करू, असे आव्हानही उद्धव यांनी भाजपचे नाव न घेता दिले. पाकिस्तानमध्ये भगवा फडकवा, आम्हाला आनंद होईल, असेही ते म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वातंत्र्यलढ्यात कुठेही नव्हता, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आरएसएसवर निशाणा साधला. वाचा: दुसऱ्या राज्यात शिवसेना मोठ्या प्रमाणात होती. पण त्यावेळी शिवसेनेने निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतल्याने आपले लोक भाजपमध्ये गेले. नाहीतर आज वेगळी परिस्थिती असती, असे उद्धव म्हणाले. पण त्याचवेळी भविष्यात शिवसेना देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारची कामे सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याची तुमची जवाबदारी आहे. तळागाळातला माणूस हा तुमच्यामार्फत माझ्यापर्यंत पोहोचला पाहिजे, अशी सूचनाही त्यांनी केली. विधानसभाध्यक्षपदाबाबत खल? शिवसेनेच्या मंगळवारच्या मोठ्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची महाविकास आघाडीतील सर्व आमदारांसोबतही सलग तीन दिवस मॅरेथॉन बैठका पार पडणार आहेत. विभागवार होणाऱ्या या बैठकांना उद्धव यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे देखील उपस्थित राहणार आहेत. नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यानंतर विधानसभाध्यक्ष काँग्रेसचाच होणार की अन्य कोणत्या पक्षाचा याबाबत उलट सुलट चर्चा सुरू असताना पहिल्यांदाच तिन्ही पक्षांच्या आमदारांची बैठक पार पडत आहे.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: