करोना रुग्णवाढीमुळे लोकल ट्रेनमधील चित्रच बदलले!

February 20, 2021 0 Comments

म. टा. प्रतिनिधी, मुंबई करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचा धसका रेल्वे प्रवाशांनी घेतला आहे. पश्चिम आणि मध्य रेल्वेवरील प्रवासीसंख्येत एकूण २ लाखांनी घट झाली आहे. तर वातानुकूलित लोकल प्रवासीसंख्याही ५ हजारांहून १ हजारांवर पोहोचली आहे. पुन्हा लॉकडाउनचा इशारा आणि राज्यातील काही शहरांत लागू झालेले लॉकडाउन यामुळे रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाचा: करोना नियंत्रणात आल्याने मर्यादित वेळेत सर्वांना लोकल मुभा दिली. लोकल सुरू झाल्याने नोकरदारवर्ग मोठ्या प्रमाणात बाहेर पडला. १५ फेब्रुवारी रोजी पश्चिम रेल्वेवरील लोकलमधून प्रवास करणाऱ्यांची संख्या १७,५९,१२३ इतकी होती. तर १८ तारखेला ती १७,०७,६२२ पर्यंत खाली आली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारीच्या तुलनेत १८ फेब्रुवारीच्या प्रवासी संख्येत एक ते दीड लाखांची घट झाली. मध्य रेल्वेवर १५ फेब्रुवारी रोजी २३,३९,१३१ अशी प्रवासी संख्या होती. तर १८ फेब्रुवारीला ही प्रवासी संख्या २०-२१ लाखांपर्यंत आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. वाचा: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करताना सुरक्षित वावर नियमांचे पालन शक्य होत नाही. अनेकांच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे प्रवाशांनी टाळण्यास सुरूवात केली आहे. ज्यांना घराबाहेर पडल्याशिवाय कमाई करणे शक्य नाही, असा वर्ग जीव मुठीत घेऊन लोकल प्रवास करत असल्याचेच रेल्वेच्या आकड्यावरून स्पष्ट होते. प्रवासी संख्येचा आढावा दिनांक - पश्चिम रेल्वे १५ फेब्रुवारी - १७,५९,१२३ १६ फेब्रुवारी - १७,४१,१२५ १७ फेब्रुवारी - १७,०७,६२२ १८ फेब्रुवारी - १७,०२,३४७ एसी प्रवासीही घटले पश्चिम रेल्वेच्या वातानुकूलित लोकलच्या प्रवासी संख्येवर देखील लॉकडाउनच्या चर्चेचा परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. १५ फेब्रुवारीला एसी लोकलमधील प्रवासी संख्या ५८७५ इतकी होती. १८ फेब्रुवारीला हीच संख्या १९८९ पर्यंत खालावली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: