मुंबई भाजपचा पदाधिकारी बांगलादेशी; काँग्रेसचा आरोप

February 20, 2021 0 Comments

मुंबई: 'भाजपचे काही पदाधिकारी गोमातेची तस्करी करताना पकडले गेले आहेत, तर काही जण पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे एजंटही निघाले आहेत. आता भाजपचा मुंबईचा अल्पसंख्याक सेलचा पदाधिकारी बांगलादेशी नागरिक असल्याचे आढळून आले आहे. भाजपचा हा संघजिहाद आहे का?,' असा सवाल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. वाचा: एक व्हिडिओ ट्वीट करून सचिन सावंत यांनी या संदर्भात गंभीर आरोप केला आहे. मुंबईमध्ये बेकायदा घुसखोरी करून राहणारा बांगलादेशी नागरिक रुबेल शेख याला पक्ष पदाधिकारी पदावर नियुक्ती केले जाते आणि दुसरीकडे सीएए कायद्याचा धाक दाखवला जात आहे. भाजपचे हे वागणे म्हणजे देश पातळीवर वेगळा न्याय आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांना वेगळा न्याय असे दिसते. भाजपामध्ये तर वाल्याचा वाल्मिकी होतो. ही नवीन पद्धती भाजपाने सुरू केली आहे काय?', अशी विचारणाही त्यांनी केली आहे. भाजपनं फेटाळले आरोप सचिन सावंत यांचे हे आरोप भाजपनं फेटाळून लावले असून सावंत यांनाच प्रतिप्रश्न केला आहे. 'सचिन सावंत हे केवळ प्रसिद्धीसाठी वायफळ आरोप करत आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा कुठल्या देशाच्या आहेत हे आम्ही विचारणार नाही. पण भाजपचा कुठलाही कार्यकर्ता बांगलादेशी नाही. पोलिसांकडे कागदपत्र असतील तर त्यांनी कारवाई करावी,' असं भाजपचे नेते, आमदार आशिष शेलार यांनी म्हटलं आहे. वाचा: वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: