रायगडावर 'अशी' रोषणाई अपमानास्पद; संभाजीराजे भडकले
कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची दक्षता घेऊन शिवजयंती साधेपणाने साजरी करण्याची तयारी करण्यात आली आहे. शिवजयंती सोहळ्यासाठी स्वराज्याची राजधानी असलेला किल्ले रायगडाही सज्ज झाला आहे. मात्र, रायगडावर करण्यात आलेल्या रोषणाईवर खासदार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ही रोषणाई विचित्र आणि अपमानजनक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ( on Lighting At Fort) वाचा: संभाजीराजे यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. 'भारतीय पुरातत्त्व विभागानं, आजच्या शिवजयंती निमित्ताने किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल,' असं संभाजीराजे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. वाचा: 'पुरातत्व खात्याचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबिरंगी प्रकाशयोजना केल्यामुळं हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो,' असंही त्यांनी पुढं नमूद केलं आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: