'पूजा चव्हाण आत्महत्या: फडणवीसांचे राज्य सरकारवर गंभीर आरोप

February 19, 2021 0 Comments

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण दाबण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी पोलिसांवर सरकारचा दबाव आहे. वनमंत्री यांना वाचविण्यासाठी हे सुरू आहे. सहसा अशा प्रकरणात पुरावे मिळत नाहीत. पोलिसांना पुरावे जमा करण्यासाठी खटपट करावी लागते; पण या प्रकरणात स्पष्ट पुरावे पोलिसांपुढे आहेत, परंतु सरकारच्या दबावामुळे पोलिसांची कारवाई शून्य आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी गुरुवारी केला. (Police Have Strong Evidence in Pooja Chavan Case, Says ) वाचा: या प्रकरणाबाबत यवतमाळ येथील रुग्णालयातील माहिती प्रसारमाध्यमांतून प्रसिद्ध झालेली आहे. तरीही सरकारकडून याबाबत काहीही कारवाई नाही. 'नो वन किल्ड जेसिका' असा एक चित्रपट आला होता, तशी या प्रकरणाबाबत परिस्थिती आहे, असे ते म्हणाले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी एक ते आठ मार्चपर्यंतचा कामकाज ठरले आहे. अधिवेशन चार आठवडे चालवा, अशी आमची मागणी आहे. परंतु सरकार कालावधी ठरविण्याबाबत आणखी बैठका घेणार आहे. सरकारला अधिवेशन चालवायचे नाही, असे दिसते. लोकसभेच्या अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडला. आता दुसरा टप्पाही होणार आहे. मग आपल्याला अधिवेशन घ्यायला कोणती अडचण आहे हे कळत नाही, असे फडणवीस म्हणाले. वाचा: विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत राज्यपालांनी पहिल्या आठवड्यात निवडणूक घेण्यास मुभा दिली आहे. सरकारकडे प्रचंड बहुमत आहे, आपल्याच आमदारांना घाबरणारे हे पहिले सरकार आहे. सरकार किती घाबरत आहे, हे यावरून दिसत आहे, असा टोला त्यांनी लगावला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: