राज्यपालांविरोधात कोर्टात जाण्याचा संजय राऊत यांचा इशारा

February 06, 2021 0 Comments

नाशिक: राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर नियुक्त करावयाच्या १२ उमेदवारांच्या नावांना राज्यपाल यांनी अद्याप मान्यता न दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता आहे. उपमुख्यमंत्री यांच्यानंतर आता शिवसेनेचे खासदार या मुद्द्यावरून राज्यपालांना इशारा दिला आहे. 'राज्यपालांनी आम्हाला कोर्टात जायला लावू नये,' असं राऊत यांनी म्हटलं आहे. वाचा: राज्यपाल कोट्यातून भरावयाच्या विधान परिषदेतील १२ जागा सध्या रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळानं त्यासाठी नावांची शिफारस राज्यपालांना केली आहे. सर्व बाजूनं विचार करून आणि नियम-अटींचे पालन करून सरकारनं ही नावं पाठवली आहेत. मात्र, नावांची शिफारस करून दोन महिने उलटल्यानंतरही राज्यपालांनी त्यावर निर्णय घेतलेला नाही. त्यामुळं महाविकास आघाडीचे नेते संतापले आहेत. राज्यपालांनी आमचा अंत पाहू नये, असा इशारा कालच अजित पवार यांनी या संदर्भात बोलताना दिला होता. त्यानंतर आज संजय राऊत यांनी या प्रकरणावर भाष्य करताना राज्यपालांवर टीका केली आहे. वाचा: 'राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. मात्र, राज्यपाल घटनाबाह्य वागत आहेत. १२ आमदारांची नियुक्ती राजकीय नाही. सरकारनं केलेल्या शिफारशी स्वीकारणं राज्यपालांना बंधनकारक आहे. मात्र, राज्यपाल त्यावर निर्णय घेत नाहीत. त्यांनी आम्हाला कोर्टात जाण्यास भाग पाडू नये,' असं राऊत म्हणाले. 'केंद्रानं राज्यपालांना परत बोलवावं,' अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. उपमुख्यमंत्री एकच राहणार! नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सरकारमधील बदलांची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्षपद अन्य पक्षाला देऊन काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याचीही चर्चा सुरू आहे. मात्र, संजय राऊत यांनी ही चर्चा फेटाळली. सरकारमध्ये एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्री नसतील आणि विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडंच राहील, असं ठरल्याचं त्यांनी सांगितलं.


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: