राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे नेते र. ग. कर्णिक यांचं निधन

February 06, 2021 0 Comments

मुंबई: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे माजी सरचिटणीस व लोकप्रिय कामगार नेते रमाकांत गणेश उर्फ यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९१ वर्षांचे होते. कर्णिक यांच्या निधनामुळं आधारवड हरपल्याची भावना कामगार क्षेत्रात व्यक्त होत आहे. वाचा: राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. कर्णिक यांनी तब्बल ५२ वर्षे १७ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनेचे सरचिटणीस म्हणून काम पाहिले. यशवंतराव चव्हाण यांच्यापासून आजपर्यंतच्या सर्वच मुख्यमंत्र्यांची राजवट त्यांनी जवळून पाहिली होती. कामगारांचा आवाज बनून त्यांनी अनेक मुख्यमंत्र्यांशी वाटाघाटी केल्या होत्या. १९७० व १९७७ मध्ये कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली सरकारी कर्मचाऱ्यांचे दोन मोठे संप झाले होते. कामगारांच्या रास्त प्रश्नासाठी लोकशाही मार्गाने संघर्ष करायचा पण तुटेपर्यंत ताणायचे नाही, अशी त्यांची कामाची पद्धत होती. त्यामुळंच त्यांच्या काळात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लागले. वाचा: वार्धक्य आणि प्रकृतीच्या कारणास्तव काही वर्षांपूर्वी त्यांनी स्वतःहून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन तसेच महागाईसकट अन्य भत्ते मिळण्याचा मार्गही त्यांच्याच काळात सुकर झाला. इतकेच नव्हे, तर केंद्राने निर्णय घेतल्यानंतर त्याच तारखेपासून त्या निर्णयाचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळू लागला. कर्णिक यांच्या निधनाबद्दल संघटनेनं तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या इतिहासात त्यांचे नाव अमर राहील, अशी भावना संघटनेच्या विद्यमान नेत्यांनी व्यक्त केली आहे. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: