सरकारने शेतकऱ्यांविरोधात सेलिब्रिटींना उतरवले; राऊतांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

February 07, 2021 0 Comments

मुंबईः पॉपस्टार हिने सातासमुद्रापलीकडून शेतकरी आंदोलनास पाठिंबा देताच येथे अनेकांना मिरच्या झोंबल्या. परदेशातील लोकांनी येथील कलाकारांचे कौतुक केलेले चालते. पण लढणाऱ्या शेतकऱयांचे कौतुक केले हा आपल्या देशातील हस्तक्षेप वाटतो. आता रिहानाच्या समर्थनासाठी जे उभे राहतील त्यांना 'देशद्रोही' ठरवले जाईल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. परदेशातील कलाकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत ट्विट करताच भारतात कलाकारांमध्येही दोन गट पडल्याचे चित्र आहे. काही कलाकारांनी हा आमच्या देशाचा अंतर्गंत प्रश्न असून बाहेरच्यांनी बोलू नये अशी भूमिका घेतली आहे. तर, काही कलाकारांनी रिहानाच्या ट्विटला समर्थन दिलं आहे. यावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून भारतातील सेलिब्रिटींना जोरदार टोला लगावला आहे. वाचाः 'जगभरातून शेतकरी आंदोलनास पाठिंबा मिळत आहे. पॉपस्टार रिहाना हिने दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनास पाठिंबा देताच पंतप्रधान मोदी यांच्या भक्तांत एकच खळबळ उडाली. स्वीडिश पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांची भाची मीना हॅरिस या उघडपणे शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी उतरताच अक्षय कुमार, कंगना राणावत, सचिन तेंडुलकरपासून ते लता मंगेशकरपर्यंत सर्व 'सेलिब्रिटीं' नी अचानक आपली मते समाजमाध्यमांवर व्यक्त केली. ‘शेतकरी आंदोलन हा आमचा देशांतर्गत विषय आहे त्यात विदेशी हस्तक्षेप नको,' असा साक्षात्कार या प्रमुख मंडळींना झाला. पण गेल्या तीन महिन्यांपासून शेतकरी एकाकी झुंज देतोय त्यावर साध्या संवेदनाही या प्रमुख मंडळींनी व्यक्त केल्या नाहीत. म्हणजेच आंतरराष्ट्रीय पाठिंबा शेतकऱ्यांना मिळू लागताच, सरकारने त्यांच्या विरोधात या 'सेलिब्रिटीज्' ना उतरवले, असा गंभीर आरोप राऊतांनी केला आहे. वाचाः शेतकऱ्यांचा लढा हा माणुसकी व न्याय हक्काचा लढा आहे. जगभरातून अशा प्रत्येक लढ्यास मानवतावादी पाठिंबा देतच असतात. शेतकरी देशात बंडाळी करू इच्छित नाहीत व ते देश तोडायला निघाले नाहीत, असंही राऊत म्हणाले आहेत. लेखातील महत्त्वाचे मुद्दे >> अमेरिकेच्या संसदेवर ट्रम्प समर्थकांनी हल्ला केला होता. तेव्हा पंतप्रधान मोदींपासून अनेक भारतीय नेत्यांनी त्या हल्ल्याचा निषेध करून बायडन या उगवत्या सूर्यास नमस्कार केला होता. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी अमेरिकेत व अहमदाबादेत प्रचार सभा घेतल्या. तोसुद्धा त्यांच्या देशातला हस्तक्षेप होता. त्यामुळे रिहानाचा विषय हा स्वतंत्र आहे. गाझीपूरच्या सीमेवरील शेतकऱ्यांना जागतिक पाठिंबा मिळत असेल तर त्याचा विचार सरकारने करायला हवा. >> देशद्रोहाचा कायदा आपल्या देशात कमालीचा स्वस्त झाला आहे, पण गाझीपूरच्या सीमेवर प्रत्येक तंबूवर तिरंगा फडकतो आहे. देशभक्तीची गाणी लागली आहेत. सरकारच्या पगडीलाच शेतकऱ्यांनी हात घातला. म्हणजे त्यांनी देशद्रोहच केला! लोकशाही व नीतिमत्तेच्या गप्पा आता फक्त तोंडी लावायला. प्रत्यक्षात दिल्लीच्या दिव्याखाली अंधार आहे. >> बळाचा वापर वाढविण्यासाठी सरकारने काय केले? पोलिसांनी लाकडाऐवजी स्टीलचे आणि लोखंडाचे दंडुके मोठ्या प्रमाणावर तयार करून घेतले. लाल किल्ल्यावरील शेतकऱ्यांच्या हाती तलवारी होत्या म्हणून पोलिसांच्या एका पथकाने हाती तलवारी घेतलेले फोटो प्रसिद्ध केले. नंतर पोलिसांनी घोडदळाच्या पलटणी आणल्या. तारांचे कुंपण घातलेच, पण दिल्लीकडे जाणाऱया रस्त्यांवर सिमेंट लावून त्यावर मोठय़ा खिळ्यांची बिछायत निर्माण केली. हे सर्व शेतकऱ्यांना रोखण्यासाठी केले असेल तर हे असले सरकार पाकिस्तान व चीनशी काय लढणार, हा प्रश्न आहेच. >> लाल किल्ल्यावरील घटनेनंतर पोलिसांनी अनेकांची धरपकड केली. गाझीपूर सीमेवरील २३५ तरुण बेपत्ता आहेत. त्यातल्या १४० जणांचा शोध आता तिहार तुरुंगात लागला. उरलेले आजही बेपत्ता आहेत. पोलिसांनी त्यांचे नेमके काय केले?


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: