प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केला अन् ११ महिन्यांनंतर....

February 07, 2021 0 Comments

म.टा. प्रतिनिधी,नगर: अनैतिक संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीचा त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात फुंकणीने वार करत खून केला आहे. अत्यावस्थ असताना त्याला रुग्णालयात दाखलही केले. अतिमद्यप्राशन केल्याने कोमात जाऊन त्याचा मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पतीच्या मृत्यूबदद्ल आपली काहीही तक्रार नसल्याचेही पोलिसांना सांगितले. मात्र, तिचे संशयास्पद वर्तन पोलिसांच्या नजरेतून जात नव्हते. त्यामुळे तब्बल ११ महिन्यांनी या खुनाला वाचा फुटली. पोलिसांनी तिला आणि तिच्या प्रियकरला अटक केली आहे. कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील ही घटना आहे. गेल्या मार्च महिन्यात प्रमोद कोरडे याचा रुग्णालयात उपचार घेताना मृत्यू झाला होता. सुरवातीला त्याच्या पत्नीने दिलेल्या जबाबानुसार आजारपणामुळे झालेला मृत्यू असल्याचा समज झाला होता. मात्र, कर्जत पोलिसांनी केलेल्या तपासात हा पद्धतशीरपणे केलेला खून असल्याचे आढळून आले. यामध्ये पोलिसांनी मृताची पत्नी आणि योगेश बावडकर यांना अटक केली आहे. त्यांनी खुनाची कबुलीही दिली. मृताची पत्नी आणि बावडकर यांचे प्रेमसंबंध होते. त्यात तिच्या पतीचा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्या दोघांनी त्याचा खून करण्याची योजना आखली. त्याला भरपूर दारू पाजून त्यानंतर त्याच्या डोक्यात चूल फुंकण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या फुंकणीने (लोखंडी पाइप) प्रहार केले. त्यामुळे जखमा झाल्या नाहीत, मात्र आतून मेंदूला मार लागला. त्यामुळे बेशुद्ध झालेल्या कोरडे याला नगरमधील एका खासगी रुग्णालयात या दोघांनीच दाखल केले. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. चौकशीसाठी पोलिस आले. तेव्हा त्याच्या पत्नीने जबाब दिला की, पतीचा मृत्यू आजारपणाने तसेच मद्यपानामुळे कोमात जाऊन झाला असल्याचे दिसत असून यासंबंधी माझी काहीही तक्रार नाही. वाचाः तिने असा जबाब दिला असला तरी तिचे एकूण वागणे पोलिसांना खटकत होते. त्यामुळे पोलिसांनी तपास सुरूच ठेवला. मृत कोरडे याच्या अंगावर आणि डोक्यावरही बाहेरून जखमा दिसत नव्हत्या. त्यामुळे पोलिसांनी वैद्यकीय अहवाल मिळविण्याचे ठरविले. त्यानुसार रुग्णालयाशी पत्रव्यवहार करून काही मुद्द्यांवर अधिक माहिती मागविली. त्या अहवालावरून मृत्यू नैसर्गिक नसून डोक्यात मार लागल्याने झाल्याचे स्पष्ट झाले. वाचाः ही माहिती हाती आल्यावर पोलिसांनी पुन्हा मृताच्या पत्नीकडे चौकशी सुरू केली. सुरवातीला तिने आणि तिच्या प्रियकरानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर मात्र दोघेही कबुल झाले. खून का आणि कसा केला याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी यासंबंधी मृताच्या भावाची फिर्याद दाखल करून घेत दोघा आरोपींना अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध संगनमताने खून करणे आणि पुरावा नष्ट केल्याची कलमे लावण्यात आली. कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पोलिस निरीक्षक अमरजित मोरे, भगवान शिरसाठ, शबनम शेख यांच्या पथकाने हा तपास केला. तब्बल अकरा महिन्यांनी दडपलेल्या खुनाला वाचा फुटली. वाचाः


from Ahmednagar News | अहमदनगर बातम्या | Ahmednagar News in Marathi | Ahmednagar Local News - Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: