कंगनाच्या अडचणी वाढणार?; 'या' प्रकरणाचा नव्याने तपास होणार

February 25, 2021 0 Comments

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई अभिनेता आणि यांच्यातील ई-मेल वाद प्रकरणाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता पथकाच्या (सीआययू) वतीने नव्याने तपास सुरू करण्यात आला असून या प्रकरणात हृतिकचा लवकरच जबाब नोंदविण्यात येणार आहे. सन २०१६नंतर थांबलेला तपास पुन्हा सुरू केला जाणार असल्याने अभिनेत्री कंगना रणोट हिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. वाचा: कंगना रणोट हिने हृतिकने आपल्याला काही खासगी आणि रोमॅन्टिक ई-मेल पाठवल्याचा आरोप केल्याने दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर हृतिकने सर्व आरोप फेटाळत कंगनाला आव्हान दिले होते. त्यानंतर या दोघांमधील वाद पोलिसांपर्यंत गेला. कंगनानेच आपल्याला हजारो मेल पाठविल्याचा आरोप करीत हृतिकने पोलिसांत तक्रार केली होती. त्याच्या तक्रारीवरून सन २०१६मध्ये वांद्रे-कुर्ला संकुल येथील सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. कंगनाने मात्र याबाबत आपणास काही माहित नसून बोगस आयडीवरून मेल पाठविण्यात आले असावेत, असे म्हटले होते. तपासाकरिता हृतिकने मोबाइल, लॅपटॉप तसेच इतर साहित्य पोलिसांना दिले होते. चार वर्षांनंतरही या गुन्ह्याचा तपास जैसे थेच आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या गुन्ह्याच्या तपासामध्ये लक्ष देऊन तो लवकरात लवकर संपवावा, अशी मागणी महेश जेठमलानी यांनी पत्राद्वारे पोलिस आयुक्त यांच्याकडे केली होती. डिसेंबर २०२० मध्ये आयुक्तांनी या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्या सीआययू पथकाकडे सोपविला. सीआययूच्या अधिकाऱ्यांनी हृतिकचा लॅपटॉप, मोबाइल तसेच या प्रकरणातील इतर कागदपत्रे सायबर पोलिसांकडून ताब्यात घेतली. २०१६ मध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर हृतिक, कंगना यांनी दिलेले जबाब यांची पडताळणी करण्यात आली. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने २०१४ मध्ये कंगनाच्या दोन मेल आयडीवरून पाठविण्यात आलेले सुमारे साडेनऊशे ई-मेल तपासण्यात आले. यापैकी सुमारे ३५० ई-मेलमध्ये आक्षेपार्ह भाषा, अश्लील छायाचित्र तसेच इतर अनेक बाबींचा समावेश आहे. जमा केलेल्या तांत्रिक पुराव्यांवरून तपास पुढे चालू ठेवण्यासाठी हृतिकचा पुन्हा जबाब घेण्यात येणार असून त्यासाठी समन्स पाठविण्यात येत आहे. या आठवड्याच्या अखेरीस त्याचा जबाब नोंदविला जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: