भाजपला मोठा धक्का! सांगलीची सत्ता गेली, राष्ट्रवादीनं केला 'गेम'

February 23, 2021 0 Comments

सांगली: पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपला धक्का दिल्यानंतर आणि ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये वर्चस्व राखल्यानंतर महाविकास आघाडीनं भारतीय जनता पक्षाला सांगली महापालिकेत मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली रणनीती आखून आघाडीनं सांगली महापालिकेत सत्तांतर घडवून आणलं आहे. राष्ट्रवादीचे सांगलीचे नवे महापौर म्हणून निवडले गेले आहेत. (BJP Lost ) वाचा: सांगली महापालिकेत ४३ नगरसेवकांच्या बळावर गेली अडीच वर्षे भाजपची सत्ता होती. महिला राखीव पदाचा कार्यकाळ संपल्यानं पुढील अडीच वर्षांसाठी आज निवडणूक होणार होती. या निवडणुकीत भाजपला धक्का देण्याची रणनीती राष्ट्रवादीनं आधीपासूनच आखली होती. त्यातच भाजपचे सात नगरसेवक निवडणुकीआधी नॉट रिचेबल झाल्यानं चुरस वाढली होती. पैकी पाच नगरसेवक निवडणुकीत फुटल्याचं समोर आलं आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांनी भाजपचे उमेदवार धीरज सूर्यवंशी यांचा पराभव केला आहे. सांगली महापालिकेत एकूण ७८ सदस्य आहेत. पैकी एका सदस्याचा मृत्यू झाल्याने ७७ मतदार राहिले होते. त्यातील दोघे जण तटस्थ राहिले. दिग्विजय सूर्यवंशी यांना ३९ मते मिळाली तर धीरज सूर्यवंशी यांना ३६ मते मिळाली. भाजपचे पाच नगरसेवक फुटले! महापौरपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जयंत पाटील आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. जयंत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपला धक्का देण्याची तयारी केली होती. तर, सत्ता राखायचीच यासाठी चंद्रकांत पाटील प्रयत्नशील होते. मात्र, त्यांना त्यात यश आलं नाही. मागासवर्गीय समिती सभापती स्नेहल सावंत यांच्यासह महेंद्र सावंत, नसीमा नाईक, अपर्णा कदम सहयोगी सदस्य विजय घाटगे यांनी आघाडीचे उमेदवार दिग्विजय सूर्यवंशी यांना मतदान केले. दोन नगरसेवक मतदान प्रक्रियेसाठी गैरहजर राहिले. त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय सुकर झाला. वाचा:


from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

Amol Kote

Some say he’s half man half fish, others say he’s more of a seventy/thirty split. Either way he’s a fishy bastard.

0 Comments: