हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?; फडणवीसांचा सवाल
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई 'मत दिले नाही म्हणून मुळा साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा ऊस खरेदी करायचा नाही, अशी भूमिका शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांनी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आता स्वत:चा ऊस शेतातच पेटवून देत आहेत. शेतकऱ्यांना ऊस तोडू द्यायचा नाही, परिणामी त्याची नोंद होत नाही आणि बँकेतून पुढचे कर्ज मिळणार नाही अशी शेतकऱ्यांची कोंडी करण्यात येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यांनी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा,' अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांनी केली. ( Questions Shiv Sena) दिल्लीतील शेतकरी आंदोलनावर ढोंगीपणा करणाऱ्या शिवसेनेचे मंत्री शेतकऱ्यांचा कसा गळा घोटतात, त्याचे हे उदाहरण आहे. शेतमाल खरेदी करताना सुद्धा राजकीय मापदंड लावणाऱ्या पक्षांना लाज वाटली पाहिजे. हीच का शिवसेनेला अभिप्रेत शिवशाही?, असा सवाल त्यांनी केला. शिवसेनेचे मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे आहे. त्यांना मते मिळाली नाहीत, म्हणून ते शेतकऱ्यांवर सूड उगवत आहेत. किमान अन्नधात्या शेतकऱ्यांला तरी पक्षीय चष्म्यातून बघू नये, या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी त्यांनी केली. '.. तर पोवाडे कधी गायचे?...' 'महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला गडकिल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचे पोवाडे गाणारे शिवशाहीर हेमंतराजे मावळे यांना पुण्यातील लाल महालाजवळ अटक करण्यात आली. छत्रपती शिवरायांच्या जयंतीला पोवाडे गायचे नाहीत तर कधी.. महाविकास आघाडी सरकार शिवशाहीरांना अटक करते, ही काय मोगलाई आहे का,' असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने शिवजयंतीदिनी सास्कृतिक कार्यक्रमांना मनाई केली आहे. यात पोवाडे कार्यक्रमही करू नये, अशी तरतूद आहे. शाहीर मावळे यांनी याचा निषेध केला. तसेच लालकिल्ल्याजवळ पोवाड्यांचा कार्यक्रम केला. तेव्हा मावळे यांना अटक करण्यात आली. हा महाविकास आघाडी सरकारचा मोगलाईचा संतापजनक प्रकार आहे, असे फडणवीस म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: