आगामी निवडणुका सेना-राष्ट्रवादी एकत्रच लढणार
म. टा. प्रतिनिधी, 'राज्यातील आगामी महापालिका निवडणुका आणि निश्चितच सोबत लढणार आहेत. काँग्रेसला कसे सोबत घेता येईल, याची चर्चा होईल,' अशी माहिती शिवसेना नेते खासदार यांनी शनिवारी दिली. महापालिकेत अधिक ताकद असलेल्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक होईल, असे सूत्र निश्चित झाल्याचेही त्यांनी सांगितले. राऊत यांनी शहर शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. या वेळी राज्यातील महापालिकेच्या आगामी निवडणुकांसंदर्भात त्यांनी माहिती दिली. 'ज्यांची ताकद जास्त त्यांचे नेतृत्व महापालिकेत जास्त ताकद असलेल्या पक्षाने पुढाकार घेऊन आघाडी स्थापन करावी. त्या पक्षाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल,' असे सूत्र ठरले आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नाशिक, औरंगाबाद या महापालिकांत शिवसेनेची ताकद जास्त आहे. तर, पिंपरी-चिंचवडसारख्या काही महापालिकांत राष्ट्रवादीची निश्चितच ताकद जास्त आहे. दरम्यान, येत्या काळात निवडणुका एकत्र लढविण्यासंदर्भात राष्ट्रवादीच्या नेत्यांशी, अजित पवार यांच्याशी चर्चा करू,' असेही राऊत यांनी सांगितले. शिवसेनेचे अयोध्येतील काम 'त्यांना' दिसेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे अयोध्येच्या दौऱ्यावर जाणार असल्याबाबत राऊत यांना विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, 'त्यांनी दौरा करू देत. प्रभू राम आपले दैवत आहे. आपली अस्मिता आहे. देशातील राजकीय नेत्यांनी तिथे जावे. ते अयोध्येत जातील तेव्हा, तिथे शिवसेनेने काय काम केले आहे. हे त्यांना तिथे दिसेल.' शिवसेनेने अयोध्येत केलेल्या कामाचा परिपाक सध्या दिसून येत आहे, असेही राऊत यांनी या वेळी सांगितले. फडणवीसांची मुलाखत घेणारच संजय राऊत हे देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार असल्याची चर्चा होती. त्यासंदर्भात त्यांना विचारले असता, इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रात संवाद तुटला जात नाही. नेत्यांत, पक्षांत विचारांचा, राजकीय विरोध असतो. आमचा फडणवीस यांच्याशी संवाद आहेच. त्यांची मुलाखत होणारच आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. तेव्हा मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते... 'नरेंद्र मोदी यांनी एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केल्याचे विधान चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच केले. कलाम यांना अटलबिहारी वाजपेयी आणि प्रमोद महाजन यांनी राष्ट्रपती केले. कलाम यांना सर्वांनी पाठिंबा दिला होता. तेव्हा मोदी राष्ट्रीय राजकारणात नव्हते. मात्र, आता काही जण प्रत्येक गोष्टीचे श्रेय घेतात. त्यातून त्यांचे हसू होते. लोक त्यांच्या विनोदावरदेखील हसत असतात,' असे संजय राऊत म्हणाले.
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: