पुणेकरांसाठी खूषखबर! पुणे मेट्रोचा पल्ला वाढला
म. टा. प्रतिनिधी, पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी ते निगडी दरम्यानच्या ४.४१ किमी लांबीच्या विस्ताराला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या प्रकल्पासाठी ९४६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, यामध्ये केंद्र सरकारच्या हिस्सा २० टक्क्यांवरून १० टक्के केला गेला आहे. त्यामुळे खर्चाचा अतिरिक्त भार राज्य सरकार आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेला उचलावा लागणार आहे. वाचा: महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनतर्फे () पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी अशा दोन मार्गिका विकसित केल्या जाणार आहेत. त्यापैकी पिंपरी-चिंचवड मार्गिकेचा विस्तार निगडीपर्यंत करण्याची मागणी सातत्याने केली जात होती. यापूर्वी या विस्ताराला मान्यता देण्यात आली होती. परंतु, कोव्हिड-१९ नंतरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार केंद्राने मेट्रो प्रकल्पातील हिस्सा कमी केल्याने अतिरिक्त खर्चासाठी पुन्हा राज्य सरकारच्या मान्यतेची गरज होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विस्तारावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आता या प्रकल्पामध्ये राज्य सरकारचा हिस्सा १७० कोटी रुपयांचा असेल, तर उर्वरित निधी कर्ज आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे. तीन स्टेशनची निर्मिती पिंपरी ते निगडी दरम्यानच्या विस्तारित मार्गावर चिंचवड, आकुर्डी आणि निगडी अशी तीन स्टेशनची निर्मिती केली जाणार आहे. या नव्या विस्तारामुळे २०२३ मध्ये निगडी ते स्वारगेट या संपूर्ण मार्गिकेवर दररोज पाच लाख प्रवासी वाहतूक करतील, असा दावा केला जात आहे. राज्य सरकारच्या मान्यतेमुळे हा प्रस्ताव केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाच्या मान्यतेसाठी पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मान्यता प्राप्त होताच, या प्रकल्पाची टप्पा-१ ए अशा स्वरूपात अंमलबजावणी करण्याचा निर्णय 'महामेट्रो'ने घेतला आहे. वाचा:
from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times
0 Comments: